अल्पवयीन मुलीचं एमआयडीसीतून अपहरण

जळगाव – तालुक्यातील शिरसोली गावात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला एमआयडीसीतील महावीर कंपनीजवळून अज्ञात व्यक्तीने काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेल्याची घटना २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.३० वाजता घडली आहे.

याबाबत गुरूवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे १७ वर्षीय मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. दरम्यान, २९ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी परिसरातील महावीर कंपनीजवळ सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास असतांना अज्ञात व्यक्तीने तिला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. पिडीत मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला मात्र तिच्या बाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर गुरूवार ९ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता पिडीत मुलीच्या वडीलांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे करीत आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh