राज्यमंत्री बच्चू कडू यांना 2 महिने सश्रम कारावासाची शिक्षा ! निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवणे महागात.

अमरावती : राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आलीये. चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयानं हा निर्णय घेतलाय. निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवणे बच्चू कडू यांना महागात पडलं आहे. राज्याचे महिला बालकल्याण व शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावास आणि 25 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. बच्चू कडू हे अचलपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत. बच्चू कडू यांच्याकडून या निकालाला हायकोर्टात आव्हान दिले जाण्याची शक्यता आहे.

बच्चू कडू यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबई येथील फ्लॅटबाबतची माहिती लपवली होती. याबाबत चांदूरबाजार येथील भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी 2017 मध्ये तक्रार नोंदवली होती. त्यानंतर बच्चू कडू यांच्या या प्रकरणी अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयात सुनावणी सुरू होती. बच्चू कडू यांच्याविरोधात लोकप्रतिनिधी कायदा कलम 125 अ अनवये गुन्हा सिद्ध झाला आहे.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांनी निवडणूक आयोगाला प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यामध्ये त्यांनी मुंबईतील आपल्या फ्लॅटची कोणतीही माहिती दिली नव्हती. याविरोधात अमरावतीतील अचलपूरचे भाजपाचे नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी तक्रार दाखल केली होती.

jalgaonsandesh

jalgaonsandesh