जळगाव – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ममुराबाद ता .जि. जळगाव येथील इयत्ता 1ली च्या विद्यार्थ्यांचे “अक्षरबाग” हे हस्तलिखित नुकतेच प्रकाशित झाले. वर्गशिक्षिका श्रीमती कल्पना चौधरी यांच्या मार्गदर्शनात वर्गातील 47 विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला.

चौदाखडी वर आधारित सुसंगत वाक्यरचनांचा पाठ व त्यावर आधारित स्लोगन असा आशय असलेले “अक्षरबाग “हे हस्तलिखित विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात लेखन करून साकार केले .दिनांक 24 एप्रिल 2023 रोजी आव्हाणे येथे केंद्राच्या कार्यक्रमात माननीय शिक्षण विस्तार अधिकारी सौ. सानप मॅडम, शिक्षण विस्तार अधिकारी श्री चिंचोले साहेब, केंद्रप्रमुख श्री वाघे सर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. इयत्ता 1ली च्या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या या हस्तकृतीचे याप्रसंगी विशेष कौतुक करण्यात आले . व वर्गशिक्षिका श्रीमती कल्पना चौधरी यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमास गावातील सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती ,माजी जि.प .सदस्य ,सेवानिवृत्त शिक्षक व केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते