मोटरसायकल वरुन पडल्याने बेलव्हाळ येथील विवाहितेचा मृत्यू

प्रतिनिधी – जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथून जवळच असलेल्या बेलव्हाळ येथील रहिवाशी महिला मोटरसायकल वरुन पडल्यावर डोक्याला गंभीर मार लागल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.

या बाबत माहिती अशी की, बेलव्हाळ येथे उमाकांत मोतीराम खाचणे हे आपल्या कुटुंबासह वास्तव्यास आहेत. दि. १९ डिसेंबर रोजी संध्याकाळी आपले काम आटपून ते पत्नी शिल्पा खाचणे (वय ३२) सोबत नशिराबाद येथून बेलव्हाळ गावाकडे जात असताना नशिराबाद खालची आळी पिपल्स बॅंके जवळ अचानक चक्कर सारखे वाटू लागल्याने शिल्पा खाचणे मोटरसायकल वरुन खाली पडल्या असता त्यांना डोक्याला मार लागला त्यानंतर नशिराबाद येथील डॉ सी पी पाटील यांच्या कडे नेले असता त्यांनी जळगाव सामान्य रुग्णालयात घेऊन जाण्याचे सांगितले असता सामान्य रुग्णालयात डॉक्टरांनी तपासणी केली असता मयत घोषित केले. मयत शिल्पा उमाकांत खाचणे यांचे दि. २० डिसेंबर रोजी शवविच्छेदन करण्यात येऊन बेलव्हाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात सासू, सासरे, पती, मुलगा असा परिवार असून त्या सामाजिक कार्यकर्ते मोतीराम खाचणे यांच्या सून होत्या.