गोंभी येथून माहेराहून प्लॉट घेण्यासाठी पैसे आणले नाही म्हणून विवाहितेचा छळ ?

प्रतिनिधी जितेंद्र काटे

भुसावळ – माहेराहून प्लॉट घेण्यासाठी पैसे आणत नाही या व इतर कारणांमुळे गोंभी येथील माहेर असलेल्या विवाहितेने तालुका पोलीसात फिर्याद दाखल केली आहे या बाबत तालुका पोस्टे सी.सी.टी.एन.एस गुरनं १९८/२०२४ बीएनएस ८५,११५(२),३५२,३५१(२),३(५) प्रमाणे फिर्यादी- सौ. ज्योती उमेश पाटील, वय ३४ वर्ष, व्यवसाय घरकाम, रा. माहेजी नांद्रा ता. पाचोरा, आरोपी -1) पती उमेश जगन्नाथ पाटील, 2) सासरे जगन्नाथ मयाराम उर्फ विठ्ठल पाटील, 3) सासु दुर्गाबाई जगन्नाथ पाटील, 4) नणद रत्नाबाई सुनिल पाटील, 5) नणंदेचा मुलगा महेश सुनिल पाटील सर्व रा. नांद्रा ता पाचोरा, 6) मामसासरे रविंद्र पोपट पाटील, रा. बांबरुड राणीचे ता. पाचोरा 7) मावस दिर अमोल बापूराव पाटील, रा. आमळदे ता. भडगांव तसेच 8) शितल प्रदिप पाटील, 9) छायाबाई भारत पाटील रा. म्हसास ता. पाचोरा अ.घ.ता.वेळ व ठिकाण -दि.११ मे २०१४ रोजी १२:५५ पासून ते दि. ०७ जुलै २०२४ रोजीचे दुपारी ३ वाजे पावेतो फिर्यादीचे सासरी तसेच माहेरी वेळोवेळी छळ केला आहे.

या बाबत फिर्यादीची फिर्याद की, वरील तारखेस वेळी व ठिकाणी यातील आरोपी मजकुर यांनी फिर्यादीस तु दिसायला चांगली नाही, लग्नात हुंडा कमी दिला तसेच मानपान केला नाही तसेच प्लॉट घेणेसाठी माहेरुन २ लाख रुपये आणले नाही या कारणावरुन फिर्यादीचे वरील सासरचे लोक यांनी फिर्यादीस शिवीगाळ, दमदाटी, मारहाण करुन शारिरीक व मानसिक त्रास दिला म्हणुन गुन्हा वगैरे मजकुरचे फिर्यादीवरुन गुन्हा रजि दाखल केला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास मा. पोलीस निरीक्षक महेश गायकवाड साहेब यांच्या आदेशान्वये पोना हेमंत मिटकरी हे करीत आहेत.

 

ताजा खबरें