आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मराठा तरुणाची आत्महत्या

मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या एका तरुणानं आत्महत्या केली आहे. सुनील कावळे (45 वर्ष) असं या आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन या तरुणानं आत्महत्या केली.

हा तरुण मुळाचा अंबड तालुक्यातील असल्याची माहिती मिळत आहे. त्याचं पार्थिव पुढील तपासणीसाठी मुंबईच्या शीव रुग्णालयात नेण्यात आलं आहे. मराठा आरक्षणासाठी ही आत्महत्या केल्यामुळे आता पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh