मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा; धनगर, मुस्लिमांना आरक्षण कसं मिळत नाही पाहतोच !

मुंबई – मागील 70 वर्षांपासून प्रलंबित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न मनोज जरांगे यानो सोडवला असल्याचा दावा केला जात आहे.

त्यामुळे मराठा समाजाला आता थेट ओबीस आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे देखील बोलले जात आहे. असे असतानाच आता धनगर आणि मुस्लीम आरक्षणाचा देखील प्रश्न मार्गी लावणार असल्याचं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केले आहे. एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागल्यावर धनगर आणि मुस्लिमांना आरक्षण कसे मिळत नाही हे पाहतोच, असा इशारा देखील जरांगे यांनी सरकराला दिला आहे.

दरम्यान याबाबत बोलतांना जरांगे म्हणाले की, “मराठा आरक्षण मराठ्यांसाठी ज्वलंत मुद्दा आहे. एकदा हा प्रश्न सुटला की, धनगर समाजाला आणि मुस्लिमांना आरक्षण कसे देत नाही तेच बघतो. मराठा आरक्षणाचा मुद्दा आता थोडा राहिला आहे. एकदा प्रमाणपत्र हातात पडू द्या, त्यानंतर मी मोकळाच आहे. धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी माझी इच्छा आहे. मात्र, हा प्रश्न सुटला पाहिजे याबाबत त्यांनी देखील म्हटलं पाहिजे. त्यांनी एकदा म्हटलं, की मग पाहतो सरकार कसं आरक्षण देत नाही, असे जरांगे म्हणाले.

रायगडाचरणी नतमस्तक होण्यासाठी आलोय…

मराठा आरक्षणाबाबत सरकारने अध्यादेश काढल्याने मनोज जरांगे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी रायगडावर पोहचले आहेत. यावेळी बोलतांना जरांगे म्हणाले की, “रायगडावर गेल्यानंतर ऊर्जा मिळते आणि विजय प्राप्त होतो. त्यामुळे रायगडाचरणी नतमस्तक होण्यासाठी आलो आहे. मी रायगडावर पायी जाणार, राजापुढे शरीराला किंमत नसल्याचे जरांगे म्हणाले.

मराठ्यांना मागास सिद्ध करण्याची जबाबदारी सरकारची…

मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आणि खुल्या वर्गातील समाजाचा सर्वे केले जात आहे. दरम्यान, यावर बोलतांना जरांगे म्हणाले की, “सरकरने मराठा समाज मागास सिद्ध केला पाहिजे. आम्हाला बाकी काही माहीत नाही, सरकार आणि मागासवर्ग आयोगाची समाजला मागास सिद्ध करण्याची जबाबदारी आहे. चांगला सर्व्हे करून सत्य परिस्थिती समोर आणायला हवी. काही ठिकाणी अडचणी येत असतील, मात्र याची संपूर्ण माहिती माझ्याकडे आत्ता नाही, असेही जरांगे म्हणाले.

ओबीसी आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात जाणार…

मराठा समाजाच्या मुलांच्या अन्नात माती मिळवण्याच काम छगन भुजबळ करत आहेत. त्यामुळे आमच्या अन्नात त्याने माती कालवण्याचं प्रयत्न करू नये. गाव खेड्यातील ओबीसी बांधवांनी त्याला हे समजून सांगावं. अन्यथा ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आम्हालाही नाईलाजाने याचिका दाखल करून हे आरक्षण रद्द करावे लागणार आहे आणि ते रद्द देखील होणार असल्याचं जरांगे म्हणाले आहेत.