ममुराबाद येथील 14 वित्त आयोगातील दलित स्मशान भुमिच्या नियमबाह्य झालेल्या कामाची चौकशी न झाल्यास करणार उपोषण…

ममुराबाद – येथील 14 वा वित्त आयोगाच्या निधीमधुन दलीतांच्या स्मशान भूमीचे वालकंपाऊंडचे नियमबाह्य काम झालेले असल्याने त्याबाबत चौकशी व कार्यवाही होत नसल्याने गुरूवार दि. 12/04/2022 पासून उपोषणाला बसण्या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर असे कि ममुराबाद ता.जि. जळगाव येथे १४ वा वित्त आयोगाचे जवळपास तीन लाख रूपये चे काम दलितांच्या स्मशानभुमी मध्ये न करता दुसऱ्याच जागी करून त्याची रक्कम १४ वा वित्त

आयोगाच्या निधीमधुन काढुन घेऊन एक प्रकारे सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी पदाचा गैरवापर केलेला आहे. सदर विषयाबाबत दिनांक 27/04/2021 रोजी सरपंच ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत ममुराबाद यांना तक्रारी अर्ज केलेला असतांना सुध्दा सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी जवळपास नऊ महिन्यांनी 14 वित्त आयोगाच्या बॅक खात्यातुन पैसे काढुन घेतले आहे. सरपंच तथा ग्रामविकास अधिकारी यांनी त्यांच्या वैयक्तिक स्वार्थापोटी दलितांच्या स्मशानभुमीचे काम अर्धवट करून पुर्ण कामाची MB तयार करून व खोटया दाखविलेल्या कामाचे बिले तयार करून सदर पुर्ण रकमेचा निधी बँक खात्यातून काढून अपहार केलेला आहे.

दलितांच्या स्मशानभुमीचे वॉलकंपाऊड 2015/16 मध्ये मंजुर होते तारकंपाऊंड बाबत ग्रामपंचायत कार्यालयात बऱ्याच वेळेस वाद उद्भवल्याने सदर कंपाऊंडचे काम आजपर्यंत रद्द ठेवण्यात आले होते. सदर 14 वा वित्त आयोगाचा निधी खर्च करावयाची मुदत दि.31/03/2021 पर्यंतची असतांना देखील सदरचे काम दिनांक 10/04/2021 ला सुरू करण्यात आले.सदर काम दलितांच्या स्मशानभुमीत मंजुर असल्याने त्याच जागी होणे अपेक्षित होते. परंतु तसे न होता, जागेत बदल करावयचा ठराव करूण जि प कार्यालयाकडे काम बदलीचा प्रस्ताव पाठवण्यात आला नाही.अथवा त्याची प्रशासकिय मान्यता न घेता, त्याकामावर मंजूर असलेला निधी हा परस्पर दूसऱ्या ठिकाणी वापरून सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी संगनमताने या निधीचा अपहार केलेला आहे. तसेच त्याबाबत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी.जि.प. जळगाव यांना दि.18/02/2022 रोजीच्या तक्रार अर्जावर कोणत्याही स्वरूपाची चौकशी अथवा कार्यवाही आजतागायत करण्यात झालेली नाही. त्यामुळे हतबल होऊन नाईलाजास्तव

दि. 12/04/2022 पासून मी जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव समोर बेमुदत उपोषणासाठी बसणार आहे.तरी माझ्या तक्रार अर्जावर दि. 11/04/2022 पर्यंत जर वरिष्ठ पातळीवर चौकशी करून संबंधीतांकडून रक्कम वसुली करण्यात न आल्यास तसेच सदर निधीचा अपहार केल्या प्रकरणी सरपंच यांचेवर अपात्रतेची तर ग्रामविकास अधिकारी यांचेवर निलंबनाची कारवाई करून फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल न झाल्यास मला माझ्या उपोषणाचा निर्णय कायम ठेवावा लागेल.अशा आशयाचे निवेदन महेद्र सोनवणे यांनी म जिल्हाधिकारी, म मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच म गटविकास अधिकारी यांना देण्यात आले आहे.