महेंद्र सोनवणे
ममुराबाद – विदगाव जळगाव रस्त्यालगत सांडपाण्याची गटार पुर्ण गाळाने भरल्याने गटारीचे दुर्गंधी युक्त पाणी रस्त्याच्या शेजारी असलेल्या मोकळ्या पटांगणामध्ये साचल्याने तेथील रहात असलेल्या नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गेल्या एक दिड महिन्यापासून रस्त्यालगतची गटार पुर्ण भरल्याने या परीसरातील नागरीकांना या सुविधीतेचे मोल मोजावे लागत आहे. तसेच रहिवाश्यांसह या रस्त्याने ये-जा करणार्या नागरीकांना दुर्गधीसह अनेक त्रासांना सामोर जावे लागत आहे. कोरोना सारखा महा भयंकर आजार पुन्हा येणार असल्याच्या सुचना महाराष्ट्र सरकार कडुन दिस्या जात असल्याने येथील नागरीकांन मध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरातील नागरीकांना दुर्गंधीमुळे धोका निर्माण झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न येथील नागरीकांच्या मनात भेडसावत आहे.
सांडपाण्याचे विल्हेवाट लावण्यासाठी कोणतीही पर्यायी व्यवस्था ग्रामपंचायत प्रशासनाकडून करण्यात आलेली नाही. त्यामुळे गटारातील सांडपाणी मोकळ्या पटांगणामध्ये पसरल्याने या पाण्यामुळे काही ठिकाणी डबके साचले आहेत. वेळोवेळी वार्डातीले सदस्यांनी सरपंच यांना याबाबत माहिती देऊन सुध्दा सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी मात्र सदर विषयाकडे जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.