ममुराबाद – सदर नियमबाह्या झालेल्या कामाबाबत श्री. महेंद्र आत्माराम सोनवणे, रा. ममुराबाद ता. जि. जळगाव यांनी येथील 14 वा वित्त आयोगाच्या निधीतुन दलीतांच्या स्मशानभुमीचे वाल कंपाऊंड नियमबाह्य झाल्या बाबतची तक्रार दिली होती त्या तक्रारीनुसार विस्तार अधिकारी एन डि ढाके (ग्रापं ) यांनी प्रत्यक्ष ग्रामंपचायत ममुराबाद येथे जावून चौकशी केली असता पुढील प्रमाणे चौकशी अहवाल. वरिष्ठ कार्यालयाकडे सादर करण्यात आला आहे.

ग्रामपंचायतीने मागासवर्गीय स्मशानभूमीस तार कंपाऊंड करणेचे काम 14 वा वित्त आयोग निधीतुन केलेले असुन सदर कामाची आराखड्यानुसार तरतुद सन 2016-17 मध्ये रक्कम रु. 3 लक्ष मात्र केलेली आहे. सदर काम सरु करणेसाठी ग्रामपंचायतीचे ग्रामसभा दिनांक 04/06/2019 ठराव क्र. 5 अन्वये ठराव पारीत करण्यात आलेला आहे. रोकडवही नुसार दिनांक 06/12/2021 रोजी एकूण खर्च रक्कम रु. 299962/- मात्र नोंद केलेला आहे. व मोजमाप पुस्तीकेनुसार सदर कामाचे एकूण मुल्यांकन रक्कम रु. 3 लक्ष झालेले आहे. सदर वार्डातील ग्रामपंचायत सदस्य यांचा जबाब घेतला असता त्यांनी त्यांचे जबाबात नमुद केले आहे की, स्मशानभूमीस लागून खंडेराव मंदिर असून सदर देवस्थान गावाचे दैवत आहे. दरवर्षी सदर ठिकाणी यात्रा भरते. त्यामुळे तार कंपाऊंडचे काम खंडेराव मंदिराहस करण्यात यावे ज्यामुळे केर कचरा तसेच मोकाट जनावरांचा त्रास कमी होवून मंदिराचे पावित्र राखले जाईल.
यावरुन ग्रामपंचायतीने आराखड्यानुसार काम केलेले असून झालेल्या खर्चाइतके मुल्यांकन झालेले आहे. तसेच ग्रामपंचायत सदस्य यांचे मागणीनुसार काम झालेले असल्याने काम नियमबाह्य आहे असे म्हणता येणार नाही.
अशा प्रकारचा चौकशी अहवाल विस्तार अधिकारी यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविला आहे.
प्रत्यक्षात मात्र चौकशी अहवाल हा तयार करतांना ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व चौकशी साठी आलेले विस्तार अधिकारी यांचे मध्ये देवान घेवानीचा व्यवहार झाल्याने काम नियमात झाल्या बाबत अहवाल तयार करयात आलेला असल्याचे तक्रारदार यांनी सांगीतले. जर काम नियमातच होते तर मग सदर कामाचे पेमेंट काम होऊन नऊ दहा महिन्यानंतर का काढले. खंडेराव देवस्थानाची रजिस्ट्रेशन ट्रस्ट असल्याने खंडेराव देवस्थानाला कंपाऊंडची गरज नाही. जर खंडेराव देवस्थानाला कंपाऊंड बनविले त्यावेळी द्रस्टच्या सभासदांनी कंपाऊंड बाबत मागणी लेखी स्वरुपात मागणी केलेली नाही.
दलितांच्या स्मशान भुमि साठी वालकंपाउंडची गरज नसतांना कृती आराखड्या मध्ये काम कसे घेण्यात आले. त्या ऐवजी सदर काम खंडेराव देवस्थानाला का घेण्यात आले नाही. दलितांच्या स्मशान भुमी वालकंपाऊंड बाबत ग्रामपंचायतीने कोणत्याच प्रकारचा काम बदलवण्या साठीचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे पाठवण्यात आलेला नसतांना कामाच्या जागेत बदल झाला कसा ?
( सब गोलमाल है )
याचाच अर्थ असा कि ग्रामपंचायतीला कोणी वाली उरलेला नाही. “हम करे सो कायदा”
सदर नियमबाह्य झालेल्या मागासवर्गीय स्मशानभुमी वालकंपाऊंडच्या कामाबाबात सरपंच, उपसरपंच, विस्तार अधिकारी, त्याचप्रमाणे सदस्य ज्यांनी जवाबामध्ये लिहुन दिले कि स्मशानभूमीस लागून खंडेराव मंदिर असून सदर देवस्थान गावाचे दैवत आहे. दरवर्षी सदर ठिकाणी यात्रा भरते. त्यामुळे तार कंपाऊंडचे काम खंडेराव मंदिराहस करण्यात यावे ज्यामुळे केर कचरा तसेच मोकाट जनावरांचा त्रास कमी होवून मंदिराचे पावित्र राखले जाईल. त्यांचेवर सुद्धा कारवाईची मागणी वरिष्ठांनकडे केली जाणार असल्याचेही तक्रारदार महेंद्र सोनवणे यांनी सांगीतले.