ममुराबाद येथे प्लास्टिक बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

जळगाव -तालुक्यातील ममुराबाद येथे दिनांक १२ रोजी प्लॉस्टीक बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन आयोजन करण्यात आले. याबाबत सविस्तर वृत्त असे कि ममुराबाद येथील रामराज्य गृप वतिने प्लॉस्टीक बॉलवर दिनांक १२ रोजी स्पर्धा आयोजीत करण्यात आली आहे. या स्पर्धेत असोदा, कानळदा, मोहाडी, धामणगाव, ममुराबाद, अशा ठिकाणाहुन जवळपास बारा ते पंधरा संघांनी भाग घेतला आहे.
या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचे बक्षीस कै.बळीराम तोताराम सोनवणे यांचे स्मरणार्थ श्री शामभाऊ सोनवणे यांचे कडुन अकरा हजार एकशे अकरा रुपये तर द्वितीय बक्षीस कै हरी भक्त पारायण श्रावण ज्योतीराम सोनवणे यांचे स्मरणार्थ.श्री मुकेश भाऊ सोनवणे यांचेकडून पाचहजार पाचशे पंच्चावन्न रुपये. तिसर्‍या क्रमांकाचे बक्षीस कै सोपानदेव चौधरी यांचे स्मरणार्थ श्री महेश चौधरी यांच्याकडून तीन हजार तिनशे तेहतिस रुपये. देण्यात आलेले आहे. यावेळी स्पर्धेची सुरुवात करतांना श्री मुकेश भाऊ सोनवणे यांचे हस्ते पुजा करून श श्रीफळ फोडण्यात आले. यावेळी शामभाऊ सोनवणे यांनी बॅटींग करून बॉलींग महेश चौधरी यांनी केली. तर महेश चौधरी यांनी बॅटींग करून मुकेश भाऊ सोनवणे यांनी बॉलींग करत स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी गावातील क्रिकेट प्रेमी उपस्थीत होते. आता प्रथम क्रमांकाचे बक्षीस कोणत्या संघाला मिळेल याकडे सर्वाचे लक्ष लागलेले आहे.