कासव गतीने कामे करणारी ममुराबाद ग्रामपंचायत

महेंद्र सोनवणे
ममुराबाद-: ममुराबाद ग्रामपंचायातीची विकासाची कामे दिरंगाईने करण्यासंदर्भात वर्ड गिनीज बुकात नोंद करावी लागेल. ग्रामपचायत प्रशासनावर लोकप्रतिनिधी तर्फे वचक नाही किंवा लोकप्रतिनिधींचे कोणी ऐकत देखील नाही.
त्यामुळे गावातील विकास कामे वर्षानुवर्षे रखडलेले दिसून येत आहेत. पाणीपुरवठा योजना असो, बंदिस्त गटार योजना असो, बराच कालावधी संपून झाला तरी अद्याप ती कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे गावातील रस्ते दुरुस्त केले जात नाहीत. गावातील खराब रस्त्यांची तर आता चर्चाच होत नाही. प्रत्येक काम विलंबाने करणे हा जणू हातखंड म्हटला पाहिजे.
वार्ड क्रमाक ३ मधिल साईबाबा मंदिराजवळ असलेले घाणीचे साम्राज्य, गावातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेले मोठमोठे रस्त्याची कामे अद्यापावेतो झालेली नाही. गावातील रस्त्यांवर काँक्रिटीकरण, पेव्हर , करण्यात आले परंतु ज्या रस्त्यावर कामे करण्यात आली ती रस्त्याची कामे या अगोदर कुठल्यातरी योजनेत झालेली असताना देखील कमी खर्च लागावा या हेतूने त्याच रस्त्यांवर परत कामे करण्यात आली. गावाच्या बाहेरील असलेल्या रस्त्यांवर उदाहरणार्थ असोदा रस्ता,जळगाव रस्ता विदगाव रस्ता , नांद्रा रस्ता, कानळदा , या सर्व सर्व ठिकाणी अद्याप पथदिवे लागलेले नाहीत. पथदिव्यांचे पोल उभे दिसताहेत पण त्यांना दिवेच लागलेली नाहीत. प्रत्येक कामात दिरंगाई हे पाचवीला पुजलेले आहे. ममुराबाद मधिल मुस्लीम मस्जिद कडून उर्दू शाळेच्या पाठीमागून जाणार्‍या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात घाण झाल्याने व शेजारीच रहिवास असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.वार्ड क्रमांक चार कडुन येणारा शिंदे वाड्याकडील रस्ता तो सरळ विदगाव रस्त्याला भिडतो त्या रस्त्यावर सुद्धा जि प मराठी मुलांच्या शाळेत पाठीमागच्या भिंतीकडुन मोठ्या प्रमाणात घाण, व उकिरडे झाल्याने ति सर्व दुर्गंधी शाळेत येऊन मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे.
मागील काही काळात ग्रामपंचायतीने काहि कामे केली ती पण थातूरमातूरच.
बाहेर गावाहुन येणारे जाणारे लोक गावाची खिल्ली उडवतात परंतु लोकप्रतिनीधीना कोणत्याच गोष्टीची लाजदेखील वाटत नाही. या उलट लोकप्रतीनीधी हसुन मोकळे होतात व सांगतात कि आमचे ग्रामपंचायत मध्ये काहिच चालत नाही. ममुराबाद येथील नागरीक सोशिक आहेत. तथापि त्यांच्या सोशिकपणाला काही मर्यादा असताना त्यांचा बांध फुटण्याची वाट ग्रामपंचायतीने पाहू नये. जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे. ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच ग्रामविकास अधिकारी यांना दूरदृष्टी असणे आवश्यक आहे. आपले गाव स्वच्छ, सुंदर व हिरवेगार करण्याची जबाबदारी सरपंचांनी नागरिकांचे सहकार्य घेऊन पार पाडावी.
पण तसे होताना दिसत नाही. गावातील रस्ते खराब आहेत, आणि हे रस्ते अतिक्रमणाने व्यापलेले आहेत. रस्त्यावरील अतिक्रमण काढण्याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाची नाही काय?
ग्रामविकास मंत्रालयाने १५ वा वित्त आयोगाच्या माध्यमातुन मोठ्या निधीची तरतुद केलेली असतांना व मोठ्या रकमेचा निधी ग्रामपंचायतीला मिळालेला असताना देखील तो निधी १५ वा वित्त आयोगाच्या बँक खात्यामध्ये पडून आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा गटविकास अधिकारी यांनी अचानकपणे ममुराबाद गावात गुप्त फेरफटका मारावा, म्हणजे हा कारभार त्यांच्या लक्षात येईल.मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा त्यांचे अधिकारी यांनी कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता कार्य केले, तरच गावातील नागरिकांना योग्य सोयी सुविधा मिळू शकतील. अन्यथा येरे माझ्या मागल्या चालू,,,,, राहील……

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

राज्यात आता दोन दिवस पावसाचे! कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात यलो अलर्ट

मॉन्सूनने आता पूर्ण राज्य व्यापले आहे. हवामान खात्याच्या अंदाजनुसार 15 जूनपर्यंत मॉन्सूनने राज्य व्यापले असून आता त्याचा पुढील प्रवास वेगाने

सुनसगाव विद्यालयात अनोख्या आदर्श पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – ग्रामिण भागात बैलगाडी हे वाहन म्हणून सहसा कोणी वापर करीत नाही बालकांपासून तर वयोवृद्धांना

बद्रीनाथमध्ये 23 प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल उलटून भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू

रुद्रप्रयाग  – बद्रीनाथ इथे प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हलर उलटून भीषण अपघात झाला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. रुद्रप्रयागमधील बद्रीनाथ

विमान उड…मोदी उड…शपथविधी होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विदेश दौरे सुरू

नरेंद्र मोदी हे तिसऱयांदा एनडीएच्या पाठिंब्यावर पंतप्रधान बनले आहेत. पंतप्रधानपदाची शपथ घेऊन आठवडा उलटला नाही तोच ते इटली दौऱयावर गेले

राज्यात आता दोन दिवस पावसाचे! कोकण, मुंबई, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात यलो अलर्ट

मॉन्सूनने आता पूर्ण राज्य व्यापले आहे. हवामान खात्याच्या अंदाजनुसार 15 जूनपर्यंत मॉन्सूनने राज्य व्यापले असून आता त्याचा पुढील प्रवास वेगाने

सुनसगाव विद्यालयात अनोख्या आदर्श पद्धतीने विद्यार्थ्यांचे स्वागत.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – ग्रामिण भागात बैलगाडी हे वाहन म्हणून सहसा कोणी वापर करीत नाही बालकांपासून तर वयोवृद्धांना

बद्रीनाथमध्ये 23 प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हल उलटून भीषण अपघात, 8 जणांचा मृत्यू

रुद्रप्रयाग  – बद्रीनाथ इथे प्रवाशांनी भरलेली ट्रॅव्हलर उलटून भीषण अपघात झाला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. रुद्रप्रयागमधील बद्रीनाथ

विमान उड…मोदी उड…शपथविधी होताच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे विदेश दौरे सुरू

नरेंद्र मोदी हे तिसऱयांदा एनडीएच्या पाठिंब्यावर पंतप्रधान बनले आहेत. पंतप्रधानपदाची शपथ घेऊन आठवडा उलटला नाही तोच ते इटली दौऱयावर गेले

रशियामध्ये मृत पावलेल्या विद्यार्थ्यांचे पार्थिव परिवाराच्या ताब्यात

जळगाव – जिल्ह्यातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी रशियात गेलेले होते चार जून रोजी मंगळवारी रात्री घरी बोलल्यानंतर बोलत असताना वोल्खोव्हा नदीच्या

मान्सूनबाबत IMD कडून धडकी भरवणारी अपडेट ;  शेतकऱ्यांनो पेरणीची घाई करू नका, काय आहे वाचा

जळगाव – दरवर्षीच्या तुलनेत यंदा वेळेआधीच मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला. यामुळे विविध ठिकाणी पाऊस कोसळत आहे. सध्या मान्सूनचा प्रवास विदर्भातील

ECHS भुसावळ अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती, 8वी ते पदवीधरांना संधी..

भुसावळ – माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजना(ECHS) भुसावळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. आठवी पास ते पदवीधरांना नोकरीची संधी

मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित; राज्य सरकारला दिली एक महिन्याची डेडलाईन

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतील आपले उपोषण स्थगित केले आहे. राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर जरांगे पाटील

धक्कादायक !  दिव्यांग पतीला विहिरीत ढकलत केला खून; पत्नीविरुद्ध गुन्हा

धरणगाव – शेतातील मंदिरात मुंजोबा देवाच्या पाया पडण्याच्या बहाण्याने घेऊन जात दिव्यांग पतीला विहिरीत ढकलून पत्नीनेच खून केल्याची खळबळजनक घटना

केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून खुशखबर ; नुकसान भरपाईच्या रकमेत वाढ

जळगाव – पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजनेअंतर्गत केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारकडून