मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दोन दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या दौऱ्याला विशेष महत्त्व होते. यावेळी, अमित शहांनी महायुतीमधील नेत्यांसोबत जागावाटपाबाबत चर्चा केल्याचं सांगितलं जातं.
अजित पवार यांनी राज्यात बिहार पॅटर्न राबवण्याचे आणि त्यांना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव अमित शहा यांच्यासमोर ठेवला आहे. अमित शहांनी विमानतळावर घेतलेल्या बैठकीमध्ये हा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. तसेच, राज्यातील २५ जागांवर मैत्रीपूर्ण लढत व्हावी असा प्रस्ताव भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासमोर ठेवलं असल्याचंही सांगितलं जात आहे.