महाराष्ट्र टिचर्स असोसिएशन जळगाव यांचे तर्फे जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी पंकज आशिया यांना निवेदन .

जळगाव संदेश न्युज नेटवर

जळगाव – आज जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सो. मा.श्री पंकज आशिया यांना महाराष्ट्र टिचर्स असोसिएशन जळगाव यांचे तर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी मागील पदोन्नती च्या वेळी काय घडले हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी समजून घेतले आणि योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.

तसेच. पगार विषयी शासनाचे ५ जुलै पासून वेतनाचे अनुदान प्राप्त झाले असूनही आज पर्यंत जूनचा महिन्याचा पगार झालेला नाही याची कैफीयत मांडण्यात आली. पगारा विषयी योग्य निर्देश देण्यात येतील असे देखील आश्वासन देण्यात आले.

या प्रसंगी महाराष्ट्र टिचर्स असोसिएशन जळगाव चे जिल्हाध्यक्ष श्री.राजेश जाधव,जिल्हा कार्याध्यक्ष श्री.वासुदेव चौधरी,पदवीधर शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.विजय बागुल, श्री.महेश पाटील (जिल्हाध्यक्ष शिक्षक समिती),तसेच श्री.राधेश्याम पाटील, श्री.अविनाश मोरे,श्रीमती माया आमोदकर,श्री.मनोहर खोंडे,श्री.सुरेश ढाके,श्री.पंढरीनाथ पाटील, श्री.बाबुलाल तायडे, श्री. अरूण पारिस्कर, श्री.खाचणे दादा आणि पदाधिकारी उपस्थित होते.