महागाईचा झटका, २०९ रूपयांनी महाग झाला व्यवसायिक सिलेंडर

नवी दिल्ली – ऑक्टोबर महिन्याची सुरूवात महागाईच्या झटक्यानी झाली आहे. खरंतर, १ ऑक्टोबरपासून एलपीजी सिलेंडरचे दर वाढले आहेत. तेल मार्केटिंग कंपन्यांनी व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ केली आणि यानुसार १९ किलोच्या सिलेंडरमध्ये २०९ रूपयांनी वाढ झाली आहे.

दिल्लीत आता इतकी आहे एका सिलेंडरची किंमत

ऑक्टोबर महिन्यात नवरात्र, दसरा असे सण येत आहे आणि त्याआधीच तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यवसायिक एलजीपी गॅस सिलेंडरचे दर वाढवले आहेत. रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार ताज्या २०९ रूपयांच्या वाढीसह नवी दिल्लीत आता १ ऑक्टोबरपासून १९ किलोच्या व्यवसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमती आता १७३१.५० रूपये इतक्या झाल्या आहेत. याआधी १ सप्टेंबरपासून व्यवसायिक एलपीजी सिंलेंडरच्या किंमतीत १५७ रूपयांची घट झाली होती.

कोलकाता, मुंबई आणि चेन्नईत आहेत हे दर

सप्टेंबरमध्ये व्यवसायक गॅस सिलेंडरचे दर कमी झाल्यानंतर याची किंमत १५२२ रूपये इतकी झाली होती. १ ऑक्टोबर २०२३ पासून दिल्लीशिवाय इतर महानगरांबाबत बोलायचे झाल्यास कोलकातामध्ये १९ किलोच्या एलपीजी सिलेंडरची किंमत १६३६ रूपये नाही तर आता १८३९.५० इतकी झाली आहे. तर मुंबईत याची किंमत १४८२ रूपयांवरून वाढून १६८४ रूपये इतकी झाली आहे. तर चेन्नईत याची किंमत १८९८ रूपये झाली आहे.