वराडसिम येथील मागासवर्गीय वस्तीत घाणीचे साम्राज्य ?

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील वराडसिम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर आणि सिद्धार्थ नगर येथील नागरिकांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले आहे. डॉ. आंबेडकर नगर आणि सिद्धार्थ नगर मधील नागरिकांनी आपल्या परिसरात असलेल्या गटारी आणि नाल्यांच्या साफ सफाई विषयी अनेक वेळा ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत सरपंच, पदाधिकारी यांना तोंडी आणि लेखी तक्रार केलेली आहे. तसेच आंबेडकर नगर आणि सिद्धार्थ नगर येथील युवकांनी गट विकास अधिकारी भुसावळ यांना सुद्धा तक्रार अर्ज दिला असून, साफ सफाई स्वच्छता करण्याचे आदेश गट विकास अधिकारी यांनी दिलेले आहे. परंतू ग्राम पंचायतीने हा आदेश फक्त कागदावरच ठेवला की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे.

नागरिकांचे अनेक प्रश्न आहेत. ग्राम पंचायत सरपंच आणि ग्रामसेवक यांना आंबेडकर नगर आणि सिद्धार्थ नगर मधील नागरिकांच्या आरोग्याचे गांभीर्य नाही का? की आंबेडकर नगर आणि सिद्धार्थ नगर या दलित वस्त्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते की काय? आम्ही ग्राम प्रशासनाला एकच सांगतो की, आरोग्य हा आमचा मूलभूत अधिकार आहे आणि त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर आम्ही सर्व नागरिक येत्या आठ दिवसांत गट विकास अधिकारी भुसावळ यांच्या कार्यालयाजवळ उपोषणाला बसणार असल्याचे समजते.

jalgaonsandesh

jalgaonsandesh