मद्यधुंद तालूका पोलिसांचा ‘धांगडधिंगा’ व्हायरल; नाचणाऱ्यांच्या अंगावर ओतले पेगवर पेग

जळगाव – तालूका पोलिस ठाण्यातील सहाय्यक फौजदार विश्‍वनाथ गायकवाड यांच्या निलंबनानंतर तालूका पोलिसांकडे संपुर्ण पोलिस दलासह वाळू व्यवसायीकांचे लक्ष केंद्रीत झाले आहे.

पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका ढाब्यावर साध्या वेशातील ही पोलिस मंडळी दारुच्या नशेत तर्र होत ताल धरताना दिसत असून, व्हायरल व्हिडीओबाबत अद्याप तरी दखल घेतली गेली नसल्याचे सांगण्यात आले.

तालूक्यतील दापोरा ते थेट कानळदापर्यंत गिरणाचे पात्र तालूका पोलिसांच्या ताब्यात आहे. या पात्राला लागून दोन दिवसांपुर्वीच परिविक्षाधीन पोलिस अधीकारी अप्पासाहेब पवार यांच्या पथकाने गावठी दारु पाडण्याचे कारखाने उद्ध्वस्त केले. गिरणेच्या पात्रातील अवैध धंद्यावर जगणारे पोलिसही कमी नाहीत.

म्हणुन की, काय चक्क वाळूचा अवैध धंदा करणाऱ्या पोलिसांचेच पितळ उघडे पाडून श्री. पवार यांनी त्यांची नियंत्रण कक्षात रवानगी केली आहे. या कारवाईला बारा तास उलटत नाहीत, तोवर तालूका पेालिस ठाण्यातील डीबी पथक आणि कर्मचाऱ्यांचा व्हिडीओ वाळूवाल्यांनी व्हायरल केला आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये नमुद एका ढाब्यात तालूका पोलिस ठाण्यातील डीबी पथक आणि कर्मचाऱ्यांच्या नाचण्यासाठी खास हलगी बोलावण्यात आली होती. एकीकडे हलगी वाजतेय अन्‌ त्यावर ठेका धरत कर्मचाऱ्यांचे नृत्य सुरु आहे. इथवर सर्वसामान्य घटना वाटते. यातील सर्व कमचारी आणि खासगीतील एक- दोन लोक साध्या वेशात दिसत आहेत.

मात्र, याच कार्यक्रमात एक जण येतो आणि हलगीच्या तालावर नाचणाऱ्या पोलिसांच्या अंगावर दारुच्या ग्लासातून पेगवर पेग ओतून नृत्य करतो. अन्य एक जण नोटांचे बंडलही काढतो. विशेष म्हणजे, जवळच लावलेल्या टेबलवर दारुच्या बाटल्या स्पष्टपणे दिसताय आणि हॉटेल पुर्ण ताब्यात असल्याने वेटर, पार्टीत आमंत्रितांव्यतिरीक्त कोणीच नसल्याचे दिसत आहे.

कारवाई की, चौकशी

सहाय्यक फौजदार विश्‍वनाथ गायकवाड यांच्या निलंबनानंतर अवघ्या काही तासांत हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला असून, यातून तालूका पोलिसांचा रुबाब आणि कर्तबगारी किती व कशा पद्धतीची आहे, असे दाखवण्याचा प्रयत्न संबंधीताने केला असावा. आता या व्हायरल व्हिडीओवरुन संबधीतांची चौकशी होते की, कारवाई याकडे मात्र लक्ष लागून आहे.

ताजा खबरें