प्रतिनिधी – जितेंद्र काटे
भुसावळ – येथून जवळच असलेल्या गोजोरे येथे नमो चषक स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या यावेळी आ. संजयभाऊ सावकारे यांनी रांगोळी व चित्रकला स्पर्धा ठिकाणी भेट देऊन कौतुक केले एवढेच नाही तर आपल्या मोबाईलमध्ये सर्व रांगोळी व चित्राचे फोटो घेतले त्यामुळे सहभागी सर्व स्पर्धकांचा आनंद व्दिगुणित झाला व उत्साह वाढला.
यावेळी प्रथम बक्षीस आमदारांकडून तर सहभागी सर्व स्पर्धकांना परशुराम राणे यांच्याकडून बक्षीस वितरण करण्यात येणार आहे. खुशी धांडे, दर्शना पाटील, डिंपल जावळे, जयश्री राणे, ऋचिता भोळे , योगीता डोळे , विजया दांडेकर, हेमलता पाटील, दिपाली सोनवणे, प्राजक्ता राणे आरती कोळी यांनी रांगोळी स्पर्धेत भाग घेतला होता तर सारीका शैलेश चौधरी, भुवनेश निळे यांनी चित्रकला स्पर्धेत सहभाग घेतला होता.या स्पर्धांचे नियोजन दिपक ढाके , पप्पू राणे, आकाश महाजन, पवन तळेले यांनी केले होते तर अनमोल सहकार्य परशुराम राणे व लक्ष्मण कोळी तसेच गावातील तरुणांचे लाभले. यावेळी आ.संजयभाऊ सावकारे, सरपंच नंदा लक्ष्मण कोळी, परशुराम राणे, लक्ष्मण कोळी व पदाधिकारी यांनी सर्व सहभागी स्पर्धकांचे कौतुक केले.