जळगावमध्ये आढळला ‘लेप्टोस्पायरोसिस’चा रुग्ण

जळगाव – जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात पहिल्यांदाच ‘लेप्टोस्पायरोसिस’ आजाराचा रुग्ण आढळून आला असून, डांगरी येथील चार वर्षांच्या बालकाला ही लागण झाली आहे. जिल्हास्तरावरील आरोग्य विभागाच्या पथकाने डांगरी येथे भेट देत पाहणी केली.

अमळनेर तालुक्यात प्रथमच या रोगाचे रुग्ण आढळून आले असून, चार वर्षांच्या बालकाला लागण झाली होती. हे कुटुंबीय ऊसतोडीसाठी बाहेर जिल्ह्यात गेले होते. परत आल्यावर कुटुंबातील बालक आजारी पडल्याने धुळे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याठिकाणी हे निदान करण्यात आले.

ताजा खबरें