कुऱ्हा पानाचे राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालयाची शैक्षणिक सहल संपन्न!

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हा पानाचे येथील राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालयाच्या ८५ विद्यार्थ्यांना घेऊन नांदुरा, खामगाव, संत नगरी शेगाव येथे नुकतीच गेली होती. इयत्ता ५ ते १० वी च्या गटातील ८५ विद्यार्थ्यांची दोन बस द्वारे सहल पार पडली. ग्राम विकास शिक्षण मंडळाचे संचालक घनश्याम बडगुजर यांच्या हस्ते बसची पुजा करून सहलीला सुरूवात झाली. यावेळी मुख्याध्यापक आर व्ही गवळी, पर्यवेक्षक एस डी वाघ , सहलीसाठी आवश्यक शिक्षक व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शनिवार दि. १३ रोजी कुऱ्हे पानाचे येथून नांदुरा-१०५ फुट हनुमान दर्शन, बालाजी मंदिर, खामगाव -पारले फॅक्टरी, शेगाव- गजानन महाराज समाधी दर्शन, माऊली वाटर पार्क शेगाव. येथे दोन बस द्वारे गेली होती.

लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद असलेल्या नांदुरा येथील १०५ फूट हनुमानाचे दर्शन घेतल्यानंतर येथीलच बालाजी मंदिराचे अतिशय सूक्ष्म रेखीव काम तसेच ब्रह्मा, विष्णू, महेश व बालाजी देवांच्या अतिशय सुंदर, मनमोहन, अविस्मरणीय अशा मूर्तींचे दर्शन घेऊन बालाजी मंदिरामध्ये प्रसादाचा लाभ घेतला. त्यानंतर शैक्षणिक क्षेत्र भेट व्हावी या उद्देशाने खामगाव येथील शिवांगी बेकर्स अर्थात पारले फॅक्टरी मध्ये विद्यार्थ्यांनी पारलेचे विविध प्रॉडक्ट यांच्या बद्दल माहिती घेऊन प्रत्यक्ष बिस्कीट कशी तयार होते? बेकिंग कशी होते? पॅकिंग कशी होते? हे प्रत्यक्षपणे पाहिले. त्यानंतर संतनगरी शेगाव येथे संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. शेवटी माऊली वाटर पार्क -शेगाव येथे विद्यार्थ्यांनी वाटर पार्क मध्ये मनसोक्त आनंद लुटला.

या शैक्षणिक सहलित विद्यार्थ्यांना ऐतिहासिक, धार्मिक, शैक्षणिक भेटीत- क्षेत्रभेट पारले कारखाना व विद्यार्थ्यांना मौजमस्ती वाटणारे वाटर पार्क या सर्वच घटकांचा समावेश असल्याने विद्यार्थी आनंदीत होत. सहल प्रमुख म्हणून योगेश गांधेले यांनी काम पाहिले. मुख्याध्यापक आर व्ही गवळी, पर्यवेक्षक एस डी वाघ, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहलीसाठी मेहनत घेतली.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

राहुल गांधींच्या प्रतिमेचा मंदिरात डोअरमॅट म्हणून वापर, व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

राहुल गांधींच्या अलीकडील टिप्पण्यांना प्रतिसाद म्हणून, ज्यांना हिंदूंबद्दल अपमानास्पद समजले गेले होते, महाराष्ट्रातील एका मंदिरात काँग्रेस खासदाराच्या प्रतिमेसह डोअरमॅट म्हणून

मुलींच्या लग्नाला शासनाकडून १० हजाराची आर्थिक मदत

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

पुरीमध्ये जगन्नाथ रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी; 400 हून अधिक भाविक जखमी

ओडिशातील पुरी येथे भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेदरम्यान चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत 400 हून अधिक भाविक जखमी झाले. त्याचवेळी एका भाविकाचा

धक्कादायक ! दुचाकीच्या भीषण अपघातात तरूण ठार तर दुसरा गंभीर जखमी

जळगाव – जळगाव तालुक्यातील सुनसगाव रस्त्यावरील महेंद्रा शोरूम येथे जात असताना स्पीडब्रेकरवरून दुचाकी उधळून डिव्हायडरला धडक लागल्याने वाहनावरील तरुण ठार

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून