कुऱ्हा पानाचे रा.धो. माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८.४९ टक्के .

प्रतिनिधी जितेंद्र काटे – भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हा पानाचे येथील राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालयाचा एसएससी मार्च २०२४चा निकाल ९८.४९ टक्के लागला असून १५ विद्यार्थी ९० टक्के पेक्षा अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.

नितिश संदीप टोंगळे याला ९४.८०टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांकावर दत्तात्रेय सुनील बारी (९३.८०टक्के)व हर्षल विनोद बारी (९३.८० टक्के) गुण मिळवले तर दर्शन सुनील वराडे याला ९३.६० टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवून शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे.

एकूण १३३ विद्यार्थी प्रविष्ट होते. त्यापैकी ८१ विद्यार्थी विशेष प्रावीण्य मिळवून, ३२ विद्यार्थी फर्स्ट क्लास, १५ विद्यार्थी सेकंड क्लास व ३ विद्यार्थी पास असे एकूण १३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. शाळेचा एकूण निकाल ९८.४९ टक्के लागला आहे. या यशामुळे ग्रामविकास शिक्षण मंडळाचे अध्यक्ष एकनाथ बडगुजर, उपाध्यक्षा भावना बडगुजर, सचिव प्रमोद छाजेड, संचालक मंडळ, मुख्याध्यापक एस पी चौधरी, पर्यवेक्षक एस डी वाघ, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

ताजा खबरें