लॉजच्या आड सुरू होता कुंटणखाना; जिल्हापेठ पोलिसांची धडक कारवाई!

जळगाव – लॉजवर सुरू असलेल्या कुंटणखानावर जिल्हापेठ पोलिसांनी छापा टाकत ५ महिलांसह पाच ते सहा पुरुषांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई आज, १२ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास करण्यात आली. या कारवाईमुळे जळगाव शहरात खळबळजनक उडाली आहे.

जळगाव जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चोपडा मार्केट येथील एका लॉजवर कुंटणखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथक तयार करून खात्रीशीर माहिती घेत चोपडा मार्केट येथे रवाना केले. यावेळी पोलिसांनी बनावट ग्राहक बनून पंटरद्वारे आत गेले असता, त्या ठिकाणी ५ महिला व काही पुरुष असल्याचे आढळून आले.

दरम्यान, या सर्व प्रकाराची खातरजमा झाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून ५ महिलांसह पाच ते सहा पुरुषांना ताब्यात घेतले आहे. शेवटची वृत्ते आले तेव्हा जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याच प्रकारचा अनैतिक व्यवसाय हा अनेक लॉजेसवर सुरू असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

सदर कारवाई पोलीस निरिक्षक विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मीरा देशमुख, सलीम तडवी, रवींद्र साबळे, तुषार पाटील, जयेश मोरे, महिला कॉन्स्टेबल मनीषा बिरारी आणि कल्पना मोटे यांनी ही कारवाई केली आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला