कोळंबा वडगाव शिवारात बिबट्याचा हैदोस..प्रतिबंध करावा.गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांची मागणी.

चोपडा(प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे कोळंबा वडगावसिम शिवारात मागील आठ दिवसांपासून बिबट्याने हैदोस घातला असून आता तर गावाजवळून बकरी,म्हशीचे पारडु,कुत्रे उचलुन घेऊन गेल्याचे ग्रामस्थांनी बघितले आहे. त्यामुळे या दोन्ही गावातील शेतकरी,शेतमजूर,गुराखी,शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.ह्या परिसरातील बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा,अशी मागणी गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी एका पत्रकान्वये केली आहे.

विशेष असे की वडगावसिम येथील पितांबर भिल यांचे शेळीचे पिल्लु व कोळंबा हायस्कूल जवळील एका खळ्यातून कुत्रा व म्हशीचे पारडु बिबट्याने उचलून नेल्याचे बाळू देवराम कोळी यांनी प्रत्यक्ष पाहिले आहे.शेतकरी अंबादास कोळी हे पिकाला पाणी भरतांना समोरच बिबट्या दिसल्याने त्यांनाही काम सोडावे लागले.एका शेतात मका खुडण्याचे काम करत असताना त्यांच्यासमोरून बिबट्या गेल्याने मजुरांना घरी निघुन जावे लागले.काही गुराख्यांना सुद्धा बिबट्या प्रत्यक्ष दिसल्याने येथील दोन्ही गावातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शेतात मजूर कामाला यायला तयार नाहीत.वडगावसिम येथून शाळकरी मुले कोळंबा येथे जातात.परंतु बिबट्याच्या धाकाने पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवायला तयार नाहीत.अशा परिस्थितीत बिबट्याला पकडण्यासाठी येथील ग्रामस्थं व शेतकरी सहकार्य करण्यास तयार आहेत.त्या करिता संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना करावी, अशीही मागणी चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर यांनी केली आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या