किनवट येथील एका ST कर्मचाऱ्याची आत्महत्या 

किनवट/माहूर (प्रतिनिधी वासुदेव राठोड)

किनवट -आगारातील वाहक पदावर कार्यरत असलेले बी.एन.सदावर्ते यांनी रविवार सकाळी नांदेड येथील आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.ते ५७ वर्षाचे होते.किनवट आगारातील ST कर्मचाऱ्यांचा ही पहिली आत्महत्या असून नांदेड विभागातून दुसरी आत्महत्या आहे.ते फेब्रुवारी २०२२ मध्ये ST सेवेतून निवृत्त होणार होते.आत्महत्या कारण अद्याप स्पष्ट झाले नसून ,मागील दोन महिन्यांपासून ST कर्मचाऱ्यांचा दुखवटा चालू आहे.दरम्यान ST सेवा बंद असल्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांना आर्थिक विवंचनेतून जावे लागत आहे.

परिणामी आपल्या कुटुंबचा गाडा कसा हाकलायचा याचा तान व नैराश्येतून त्यांनी आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज आहे.त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणी साठी सिविल हॉस्पिटल नांदेड येथे दाखल करण्यात आला असून त्याचा अहवाल अद्याप येणे बाकी आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले,एक मुलगी ,सून,जावाई असा परिवार आहे.दरम्यान सदर आत्महत्येबाबत ST कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचा जाहीर निषेध केला आहे.किनवट आगारातून ST कर्मचाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

ताजा खबरें