“सरला एक कोटी” या मराठी चित्रपटातील “केवड्याचं पान तू कस्तुरीचं रान तू…” या गाण्याने अक्षरश: धुमाकूळ घातला होता. या मराठी प्रसिद्ध गाण्याचा रिमेक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून “खेकड्याचं सार तू…” असे या गाण्याचे बोल आहेत.
हे गाणं अनेकांनी सोशल मीडियावर शेअर केलं आहे.
https://www.instagram.com/reel/Cr7aIikIe02/?utm_source=ig_web_button_share_sheet&igshid=NjFhOGMzYTE3ZQ==
दरम्यान, अभिनेता रोशन राजेंद्र या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. खेकड्याच्या भाजीचं वर्णन या गाण्यामध्ये केलं आहे. खेकड्याची भाजी भाकरीसोबत कशी लागते यावर यो दोन कडव्याच्या गाण्यामध्ये वर्णन केलं असून अनेकांनी या गाण्याला पसंती दिली असून मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
या गाण्याला नेटकऱ्यांकडून चांगलीच पसंती मिळत असून या गाण्याचे बोल खालीलप्रमाणे आहेत.
खेकड्याचं सार तू
वार रविवार तू
तांबड्या सांबऱ्याची धार तू…
नांगीमधलं मास तू
खोबऱ्याचा वास तू
भाकरीच्या संग लागे बाप तू