ममुराबाद – जळगाव तालुक्यातील ममुराबाद गावात घाणीचे साम्राज्य, निर्माण झाले असून गटारीचे पाणी चक्क रस्त्यांवरून वाहू लागले आहे.तर गावात 14 वा वित्त आयोगातुन महिला व पुरुषांच्या साठी स्वच्छता गृह मंजूर करण्यात आले होते, परंतू त्या शौचालया पैकी काहि शौचालया मध्ये महिलांना जायला सुद्धा रस्ता नाही.

साधारण एक महिन्या पुर्वी दलीत वस्ती सुधार अतर्गत योजनेत दलीत वस्तीमध्ये बांधण्यात आलेल्या भुमीगत गटारी चक्क जमिनीपासुन एक ते दिड फुट उंचिवर बांधण्यात आल्या आहे.
त्या गटारी मध्ये महिन्याभरात पाण्याचा एक थेंबही वाहिलेला नाही. तेथील नागरीकांनी सरपंच. ग्रामसेवक. काहि सदस्य यांचेकडे याबाबत तक्रारी पण केल्या परंतु सगळ कस ओकेमध्ये आहे. सरपंच निवड झाल्या पासुन गावातील गटार ह्या फक्त 2 वेळेस काढल्या गेल्या आहेत, त्यात एवढी घाण आहे की गटारीचे पाणी हे रस्त्यावरून वाहत आहे,
https://youtu.be/PbqiiyT4PEw
गावातील बऱ्याच ठिकाणी गटारी पुर्ण गाळाने भरल्याने गटारीचे पाणी वाहायला जागा नसल्यामुळे काही ग्रामस्थांच्या बाथरूमचे पाणी बाहेर गटारीमध्ये न जाता बाथरूममध्ये ते पाणी साचुन घरामध्ये तुंबत आहे.त्यामुळे गावातील ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.
या आधीही गंभीर प्रकारे आजार येथील ग्रामस्थांना उद्भवलेले आहे. त्यामुळे गावातील लहान सहान क्लिनीक पेशंटने फुल्ल भरलेले असातात.याबाबत तक्रार करायची तरी कोणाकडे कारण ग्रामसेवक महाशय तर आठवड्यातुन 1 किंवा 2 दिवस गावात येतात.
खुद्द ग्राम पंचायत सदस्यांना सुद्धा घराचा उतारा किंवा काही कागदपत्रांनसाठी त्यांची वाट पहावी लागते तर इतरांचा विचारच न केलेला बरा.सरपंच हे सगळं होतं असतांनाही गावात काहीही समस्या नसल्याच्या आविर्भावात वागतात.म्हणून ग्रामस्थ वैतागले आहेत.
पाण्याची समस्या कायम,,
गावात जवळपास चार ते पाच दिवसापासुन पाणी पुरवठा बंद असल्याने ग्रामस्थांची कामाच्या दिवसात मात्र पाण्यासाठी भटकंती होत आहे. पर्यायी पंपाची व्यवस्था असतांना देखील पदाधिकारी मात्र हेतुपुरस्कर दुर्लक्ष करीत आहे.
गावातील समस्या लवकरात लवकर सोडवल्या नाही तर येणाऱ्या 15 ऑगस्टच्या ग्रामसभेवर बहिष्कार टाकण्यात येईल. असा ईशारा ग्रामस्थांनी दिलेला आहे.
म्हणुन ममुराबाद चा कारभार कसा एकदम ओक्केमध्ये चाललाय,,,,,