कर्नाटकात काँग्रेसला स्पष्ट बहुमत, 130 जागांवर आघाडी

कर्नाटकात काँग्रेसला पूर्ण बहुमत मिळालं असून,130 जागांवर आघाडी घेतली आहे . दक्षिण भारतात सत्ता असलेलं एकमेव राज्य भाजपनं गमावलं आहे. कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल मतमोजणीला आज सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. सकाळ पासूनच कल काँग्रेसच्या बाजूने होता. 2018 च्या तुलनेत काँग्रेसला यंदा जादा जागा व्यापता आल्या आहेत. बेळगावात कार्यकर्त्यांनी गुलालची उधळण करत जल्लोष केलायं. आता काँग्रेस नेतृत्व मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात घालणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलयं

बहुमत मिळवण्यासाठी जेडीएसला सोबत घ्यावं लागणार अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र काँग्रेस बहुमताचा आकडा गाठणार, आम्हाला कुणाच्याही पाठिब्यांची गरज लागणार नाही असा विश्वास सिध्दरामय्या यांनी व्यक्त केला होता. तर लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांना जनतेनं जागा दाखवली अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली होती.

दरम्यान, कर्नाटकात काँग्रेस कार्यकर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळण करत आणि हातात फलक घेत विजयाचा जल्लोष केला साजरा केला.काँग्रेसच्या वादळाचा भाजप- जेडीएसला मोठा फटका बसला आहे.2018 च्या तुलनेत काँग्रेसच्या 50 जागा वाढल्या आहेत.तर भाजपच्या 37 जागा घटल्या आहेत. 2018 च्या तुलनेत जेडीएसच्या 15 जागा घटल्या आहेत.

jalgaonsandesh

jalgaonsandesh