करंज येथे कोवीशील्ड लसीकरणाचा कॅम्प यशस्वीपणे पार पडला. एकाच दिवसात तब्बल 465 लोकांचे लसीकरण

विशाल कोळी

जळगाव -तालुक्यातील करंज येथे कोवीशील्ड लसीकरणाचा कॅम्प यशस्वीपणे पार पडला. एकाच दिवसात तब्बल 465 लोकांचे लसीकरण करण्यात आले त्यासाठी ग्रामपंचायतीचे सरपंच सौ भारती देवेंद्र पाटील तथा सरपंच पती देवेंद्र पाटील यांनी वेळोवेळी आरोग्य विभागाच्या अधिकारी तथा पंचायत समिती सभापती सौ ललिता जनार्दन कोळी यांच्याशी संपर्क साधून जास्तीत जास्त लस उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली .त्यानंतर आज दिनांक ८ रोजी 465 लसांचे नियोजन करून कॅम्प यशस्वी करण्यात आला. कार्यक्रमच्या ठिकाणी पंचायत समिती सभापती सौ ललिता कोळी यांनी लस आवश्यक का आहे याबाबत मार्गदर्शन केले तसेच राजू चव्हाण यांनी देखील मार्गदर्शन केले .संपूर्ण गावांमध्ये शांततेने लसीकरण मोहीम राबवली त्याबद्दल सरपंच भारती पाटील यांनी समस्त गावकऱ्यांचे आभार व्यक्त केले तसेच उपसरपंच पती संजय सपकाळे, पोलीस पाटील सुनील सपकाळे अनिल सपकाळे व तरुण मंडळी या सर्व लोकांचे सहकार्य राहिले तर करंज आणि धानोरा ग्रुप ग्रामपंचायत सर्वप्रथम 95% लसीकरण झालेलं तालुक्यातील पहिलं गाव असेल असे आश्वासन सरपंच यांनी ग्रामस्थांना दिले.