कानळदा -: 12 वी च्या परीक्षेच्या ऑनलाईन निकाल जाहीर झाला आहे.
कानळदा आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा 87.66% निकाल लागला आहे.
फेब्रुवारी 2022-23उच्चमाध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला विद्यालयातील 154 विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी 3 विद्यार्थी विशेष प्रावीण्य सह, 47 विद्यार्थी प्रथम श्रेणीत व 59 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य, कैलाश चव्हाण,पर्यवेक्षक,प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गातर्फे अभिनंदन करण्यात आले.व त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा देण्यात आल्या.आदर्श विद्यालयाची बाविस्कर योगिता सोपान हिने 81.83% मिळवुन प्रथम क्रमांक मिळवला .
कोळी दिव्या एकनाथ हिने 75.50% मिळवुन द्वितीय क्रमांक मिळवला आहे. तसेच सोनवणे अस्विता रविंद्र हिने 75.33% मार्क मिळवून तृतिय क्रमांक मिळवला आहे. त्याच प्रमाणे
मुलांमधून सोनवणे निखिल सोमनाथ 66.50 % मिळवुन पहिला नंबर मिळावला आहे. केंद्रावर कॉपी मुक्त परीक्षा होण्यासाठी शाळेचे प्राचार्य यांनी परिश्रम घेतले.