
रणजीत हा एक ग्रामीण भागातील खेळाडू असून कोणत्याही प्रकारचे स्केटिंग ट्रॅक उपलब्ध नसताना रोज सकाळी 4 वा. उठून रोडवर स्केटिंग सराव करत कठोर परिश्रम रणजीत कडून लोखंडे करून घेतले त्या परिश्रमाने गोल्ड मेडल मिळवून यश संपादन केले असे रेल्वे ताप्ती स्पोर्ट्स यांनी अभिनंदन करताना सांगितले आमच्या परिवारातील रणजीत हा पहिला खेळाडू आहे त्याने नेपाळ या देशात भारताचा टी-शर्ट घालून भारताचे प्रतिनिधित्व करत देशाचे व आमच्या गावाचे नाव उंच शिखरावर पोहोचले हे आमच्यासाठी अभिमानास्पद व आनंदाची ची गोष्ट आहे असे त्याचे वडील रवींद्र सपकाळे व आई सौ आशा सपकाळे यांनी सांगितले यापुढे सुद्धा रणजीत ने असेच यश संपादन करून देशाचे व गावाचे नाव उंच शिखरावर पोहोचावे असे त्याच्या आईने सांगितले स्पर्धा करत असताना रणजीत ला त्याचे प्रशिक्षक श्री अमर लोखंडे जळगाव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले