कानळदा येथे महापरिनिर्वाण दिन साजरा

विजय सपकाळे

आज कानळदा येथे महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. कानळदा येथील भारतीय बौद्ध महासंघ जळगाव तालुका मित्र मंडळाच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला कार्यक्रमाप्रसंगी कानळदा येथील प्रथम नागरिक माननीय पुंडलिक तुळशीराम सपकाळे सरपंच कानळदा. यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण केली उपसरपंच रूपालीताई आनंदा सपकाळे तसेच जळगाव तालुका भारतीय बौद्ध महासंघ आच्या तालुका अध्यक्ष जगदीश भाऊ सपकाळे ग्रामपंचायत सदस्य कानळदा जय भिम मित्र मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते.

jalgaonsandesh

jalgaonsandesh