ज्योतिषानं काढली भाजप-काँग्रेसची कुंडली अन् थेट सांगितला लोकसभेचा निकाल; नेटकरी घेतायेत मजा

मुंबई: सध्या देशात लोकसभा निवडणूकांचं वारं वाहतंय. लोकशाहीची जत्राच सुरु आहे म्हणा की…भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, आप, शिवसेना….सर्वच पक्ष आपापल्या ताकदीनं लढतायत. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि शहरातल्या फाईव्ह स्टार हॉटेल्सपासून ते गावाकडच्या पारापर्यंत सगळीकडंच कसा माहौल तयार झालाय.

दिवस म्हणू नका, रात्र म्हणू नका उमेदवार आणि कार्यकर्त्यांनी पायात भिंगरीच बांधलीय जणू. कोण म्हणतंय देशात पुन्हा मोदीच येणार, तेही ४०० पार करून…तर कुणी म्हणतंय यावेळी यंदा ओन्ली रागा….राहुल गांधी मोदींच्या नाकावर टिच्चून येणार… सोशल मीडियावर तर नुसता धुरळाच चाललाय. एखादी पोस्ट पडतीये ना पडतीये तोच लोक तुटूनच पडतायत. प्रत्येक पोस्टवर कमेंटचा नुसता पाऊसच..

मतदारराजा नेमका कुणाच्या बाजूनं उभं राहणार याचा अंदाज बांधणं तसं मुश्किल झालंय. जुने जानते पुढारी, त्यांचे कट्टर कार्यकर्ते, राजकीय विश्लेषक, पत्रकार, कैक उन्हाळे-पावसाळे खाऊन केस पांढरे झालेली म्हातारी-कोतारी, चॅनेलवाल्यांचे पेड-अनपेड ओपिनियन पोल सगळेच आपापल्या पद्धतीनं अंदाज लावतायत. पण या सगळ्या लफड्यात मतदारराजा मात्र गोंधळून गेलाय. आता हे काय कमी होतं, म्हणून आता ज्योतिषीपण यात उतरलेत.

ज्योतिषांनी काय भाकित केलंय..

नंदकुमार पाठक असं या ज्योतिषाचं नावय…त्यांनी काँग्रेस आणि भाजप दोन्ही पक्षांची प्रॉपर कुंडलीच काढलीये आणि निकाल कुणाच्या बाजूनं लागणार हेच डायरेक्ट सांगून टाकलंय. विषयच क्लोज करून टाकलाय म्हणा की….

ते म्हणतायत, “येणाऱ्या लोकसभा निवडणूका व त्यांचे निकाल याबाबतीत सर्व देश व जगाचे लक्ष लागलेले आहे. यामध्ये प्रामुख्यानं भाजप व काँग्रेस हे दोन पक्ष रणसंग्रामात उतरलेले आहेत. वर दिलेल्या दोनही पक्षांचे कुडलीनुसार निकाल कसा लागेल हे बघूया.

भाजपची कुंडलीतील रास वृश्चिक असून काँग्रेसच्या कुंडलीतील रास मेष आहे. दोन्ही राशींचे खाली मंगळ आहे. सत्तेसाठी लागणारे राजकारणी राहू दोनही कुंडलीत पराक्रम स्थानात आहे व केतू ग्रह भाग्य स्थानात आहे. भाजपच्या वृश्चिक राशीप्रमाणे मंगळ ग्रह मे महिन्यात पाचवे स्थानवर आहे. मे

महिन्यात सर्व राज्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण होईल. हा कालखंड भाजपला खूप अनुकूल आहे. पूर्व-उत्तर दिशेकडे भाजपला सीट्स चांगल्या मिळतील. अटीतटीचा सामना होऊन विजय मिळेल. काँग्रेसच्या मेष राशीप्रमाणे पश्चिम दिशेकडे व दक्षिण दिशकडील काही भागात मताधिक्य वाढून सीट्स चांगल्या वाढतील.

शनी ग्रहाचे भ्रमण भाजपसाठी चतुर्थ स्थानात म्हणजे सुख स्थानात असल्यानं बहुमत मिळेल. भाजप पक्षास ३९६ ते ३९८ जागा मिळतील. काँग्रेस व इतर घटक पक्षास १३२ व अपक्षास १२ ते १५ अशा जागा मिळतील, असे दिसते. येत्या काही १०-१५ वर्षापर्यत भाजप पक्षास बहुमत व सत्ता मिळून भारताचा कारभार चालेल असे दिसते.”

नेटकऱ्यांना हवाय ज्योतिष बुवांचा पत्ता-

नंदकुमार पाठक यांनी कुंडली चेक करून या निवडणूकीत कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार आणि नेमकं कुणाचं सरकार बनणार हेपण सांगितलंय.

आता त्यांनी काढलेली ही कुंडली सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतीये. नेहमीप्रमाणे सोशल मीडिया फायटर एक्टिव्ह मोडमध्ये आलेत. कमेंट वॉर सुरु झालंय. एका एक्स (पूर्वीचं ट्वीटर) युजरनं ज्योतिषबुवांचा पत्ताच मागितलाय. त्याला ड्रीम ११ वर टीम लावायचीये. दुसरा म्हणतोय, यांचा पत्ता द्या. लग्नाबद्दल विचारायचं होते. एका युजरला ज्योतिषबुवांच्या भाकितात थोडी गडबड वाटली. तो कमेंटमध्ये म्हणतोय तुम्ही भविष्य बरोबर वर्तवलंय, फक्त तिकडचं इकडं आणि इकडचं तिकडं केलंय. तर आणखी एकजण म्हणतोय, ज्योतिषी पण म्हणतोय ४०० पार येणार नाहीत. इकडे भाजप-काँग्रेस फाईटमध्ये एका युजरला मनसेची आठवण आलीये. तो म्हणतोय मनसेची कुंडली पण दाखवा. जीवनरेखा आहे का संपली बघा म्हणावं.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं