पत्रकार गरीबांना चुकुनही जाहिरात मागत नाही, फक्त प्रसिद्ध व्यक्तींनाच मागतात, म्हणून नाही म्हणु नका – पत्रकार सेवा संघ चा इशारा.

जाहिरात नाही तर बातमी नाही व कुठलेच सहकार्य देखील राहणार नाही – आशिष शेळके, तालुकाध्यक्ष

किनवट ता. प्र. मारोती देवकते

संपूर्ण महाराष्ट्रात पत्रकारांच्या समस्या दुर करण्यासाठी तसेच पत्रकारांच्या सेवेसाठी कार्यरत असणारी संघटना म्हणजेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य ही संघटना आहे. प्रत्येक वेळा व प्रत्येक ठीकाणी पत्रकार सेवा संघ ही पत्रकारांच्या मदतीला धावून येत असते. या संघटनेचे किनवट तालुका अध्यक्ष आशिष शेळके यांनी सर्व लोकप्रतिनिधी, नेते, पुढारी व कार्यकर्ते तसेच शासकीय, निमशासकीय व खाजगी कर्मचाऱ्यांना व उद्योगपतींना इशारा दिला आहे की, जर तुम्ही आम्हाला जाहिरात दिलात तरच आम्ही तुम्हाला प्रसिद्धी देऊ, जर जाहिरात नाही तर बातमी नाही व कुठलेच सहकार्य देखील राहणार नाही.
पत्रकारांशी संवाद साधताना पत्रकार सेवा संघ चे किनवट तालुका अध्यक्ष आशिष शेळके म्हणाले की, पत्रकार सेवा संघ ही संघटना या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे सरांच्या नेतृत्त्वाखाली अहोरात्र पत्रकारांच्या सेवेसाठी काम करत आहे. अशाच काही समस्यांपैकी जाहिरात जमा करणे हे देखील पत्रकारांची मोठी समस्या सध्या दिसत आहे. कारण दिवाळी म्हटलं की प्रत्येक वृत्तपत्राचे संपादक जाहिरात साठी आपल्या सर्व प्रतिनिधीना टार्गेट देत असतात, व ते टार्गेट पुर्ण करणे हे प्रत्येक वृत्तपत्रांच्या प्रतीनीधीचे कर्तव्य असते कारण याच जाहिराती च्या टार्गेट वरच कुठलाही वृत्तपत्र चालत असतो. तसेच बहुतांश पत्रकारांची उपजिवीका ही जाहिराती वरच अवलंबून असते. आमचे पत्रकार बांधव जाहिरात ही कधीच गोरगरीब व्यक्तींना मागत नसतात, किंवा एखाद्या गरजू व वंचित व्यक्तींना त्यांची बातमी लावण्यासाठी जाहिरात मागत नसतात. आमचे सर्व पत्रकार बांधव हे जाहिरात त्यांनाच मागतात जे व्यक्ती आपापल्या परीसरात प्रसिद्ध असतात. जसे की, लोकप्रतीनीधी, नेते, पुढारी, कार्यकर्ते, उद्येगपती, संस्थाचालाक व काही शासकीय व निमशासकीय व खाजगी कर्मचारी यांनाच आपले पत्रकार बांधव हे जाहीरात मागत असतात. कारण की या सर्वांना पत्रकारांनी आपापल्या वृत्तपत्रातुन व बातमी मधुन प्रसिद्धी दिलेली असते. यांची प्रत्येक बातमी लाउन यांचा प्रचार व प्रसार केलेला असतो म्हणुन हक्काने पत्रकार बांधव यांना जाहिरात मागत असतात. तरीसुद्धा जाहिरात म्हटलं की यातील काही व्यक्ती हा पत्रकारांना टाळत असतो ही शोकांतिका आहे.
सर्वांना दिवाळी जाहिरात निमित्ताने सांगु इच्छितो की, आमचे सर्व पत्रकार बांधव यांना कुठलेही पगार, वेतन व मानधन नसताना देखील बातमी कव्हरेज साठी अहोरात्र प्रयत्न करत असतो. पण आता यांनतर सर्व पत्रकार बांधवांना विनंती आहे की, जो व्यक्ती आपल्या वृत्तपत्राला या दिवाळीला जाहिरात देणार नाही त्यांची एकही बातमी लाऊ नका, त्यांना प्रसिद्धी देऊ नका, त्यांचा प्रचार व प्रसार करु नका, व त्यांना कुठलेच सहकार्य करु नका. चालु घडामोडी, घटना, गरीबांच्या बातम्या तर आपण मोफत लावतोच पण या अशा बलाढ्य व प्रसिद्ध व्यक्तींच्या बातम्या बिलकुल मोफत लाऊ नका. तरच या नेते व पुढाऱ्यांना आपल्या पत्रकार बांधवांची किंमत कळेल.
पुढे बोलताना आशिष शेळके म्हणाले की, आमच्या पत्रकार सेवा संघटना ही अख्या महाराष्ट्रात कार्यरत आहे व या संघटने मध्ये जेवढे काही वृत्तपत्रांचे, टि.व्ही चॅनलचे, युट्युब चॅनल चे व पोर्टलचे संपादक व पत्रकार बांधव आहेत आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की जाहिरात नाही तर बातमी नाही व या नेत्या, पुढाऱ्यांना येणाऱ्या सर्व निवडणुकीत कुठलेच सहकार्य देखील राहणार नाही.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ किनवट च्या वतीने दिलेल्या या ईशाऱ्यांमुळे सर्व पत्रकार बांधवांची जाहिरात जमा करण्याची समस्या दुर होईल का ?, की जाहिरात नाही दिल्यामुळे येणाऱ्या काळात होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये व यांच्या प्रचार प्रसार माध्यमांमध्ये काय परीणाम होईल ? यांकडे सर्व नागरिकांचे आता लक्ष लागुन राहिल.

jalgaonsandesh

jalgaonsandesh