जिल्ह्यातील बांधकाम कामगारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव -शहर आणि जिल्ह्यातील बांधकाम कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भाकपप्रणीत सिटू संघटनेच्या नेतृत्वाखाली निदर्शने करण्यात आली . आज बांधकाम कामगारांच्या देशव्यापी संपाचा दुसरा दिवस आहे . आंदोलनकर्त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडून होत असलेल्या दुर्लक्षाबद्दल संताप व्यक्त केला . जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले .

या आंदोलनकर्त्यांनी सांगितले की , त्यांनी आधी १८ ऑक्टोबररोजी बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या सचिवांना निवेदन दिले होते . मात्र पुढे काहीच कार्यवाही झाली नाही . जिल्ह्यात २०१७ सालापासून या कामगारांचे लाभ प्रलंबित आहेत . १६ जानेवारी , २०१६ आणि २ जानेवारी , २०२० रोजी कामगार उपायुक्तांच्या कार्यालयात झालेल्या बैठकांमध्ये बांधकाम कामगारांच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या होत्या . मात्र काहीच कार्यवाही होत नाही . कोविद अनुदान , औजारे खरेदी अनुदान , पाल्यांची शिष्यवृत्ती , आरोग्य लाभ , प्रसूती अनुदान , विवाद अनुदान मिळालेले नाही . जिल्ह्यात २०१२ सालापासून नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांना सर्व लाभांसाठी पात्र समजण्यात यावे नोंदणी आणि नूतनीकरणाच्या कामातील अनागोंदी आणि दलालांचा हस्तक्षेप थांबला पाहिजे . बांधकाम कामगारांना पंतप्रधान आवास योजनेतून घरे बांधून द्या , भांडे खरेदी अनुदान आणि दिवाळी भेट रक्कम प्रलंबित आहे , ती तात्काळ मिळावी , शासनाच्या २३ जुलै २०२० रोजीच्या निर्णयाची अमलाबावानी जिल्ह्यात तात्काळ झाली पाहिजे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh