लायन्स क्लब तर्फे झुरखेडा ग्रामपंचायतीला शवपेटी भेट देण्यात आली

धरणगाव – तालुक्यातील झुरखेडा गावात शवपेटीची उणीव असल्याचे व शवपेटीअभावी गावातील मृत व्यक्तीच्या कुटुंबाला दु:ख बाजुला सारून शवपेटीसाठी परिसरातील गावांत जाऊन शोध घ्यावा लागे. आता लायन्स क्लब जळगाव यांच्या दातृत्वामुळे ही गैरसोय दूर झाली आहे.

सविस्तर ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच सुरेशआप्पा पाटील यांनी गावातील नामवंत ॲड विरेंद्र पाटील यांना सोबत घेऊन मा अध्यक्ष ला ॲड योगेश साखला लायन्स क्लब,जळगाव यांच्याकडे झुरखेडा गावासाठी शवपेटीसाठी बऱ्याच दिवसापासून मागणी केली होती मा अध्यक्ष लायन्स क्लब यांनी झुरखेडा गावाची मागणी लक्षात घेता दि.२८ जुलै रोजी स्टेलन्स स्टिलची वातानुकूलित शवपेटी जैन हिल्स शिरसोली जळगाव येथे  नवनिर्वाचित मा अध्यक्ष ला सपना छोरिया, ला शितल साखला व ला. सर्व पदाधिकारी,मान्यवर यांच्या उपस्थित झुरखेड्याचे लोकनियुक्त सरपंच सुरेशआप्पा पाटील यांच्याकडे गावासाठी शवपेटी सुपूर्त करण्यात आली. यासमवेत त्याठिकाणी उपस्थित गावातील  हिरालाल पाटील, आयकर निरीक्षक,जळगाव, महेंद्र बाविस्कर भूजल विभाग जळगाव, ग्रामपंचायत पा. पू. कर्मचारी  नामदेव बाविस्कर व ला चे सर्व मान्यवर उपस्थीत होते.

गावात शवपेटीअभावी मृतात्म्यांचे पार्थिव आप्तेष्ट येईपर्यंत व अंत्ययात्रेस उशीर झाल्यास सुस्थितीत ठेवण्याच्या कामी अडचण येत होती. गावात शवपेटीची उणीव असल्याचे व शवपेटीअभावी गावातील मृत व्यक्तीच्या कुटुंबाला दु:ख बाजुला सारून शवपेटीसाठी परिसरातील गावांत जाऊन शोध घ्यावा लागत असे. मात्र आता लायन्स क्लब जळगाव यांच्या दातृत्वामुळे ही गैरसोय दूर झाली आहे. त्यामुळे गावातील ग्रामस्थ व  ग्रामपंचायत झुरखेडा यांच्या वतीने समाधान व्यक्त करत लायन्स क्लब जळगाव यांचे आभार मानले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh