संत रविदास मानवतेचे पुजारी होते : जयसिंग वाघ

भुसावळ – भारतात १२ व्या शतका पासून संत परंपरा निर्माण झाली त्या परंपरेतिल १४ व्या शतकात जन्माला आलेले संत रविदास हे प्रखर मानवतावादी होते, स्त्री – पुरूष विषमता न मानता त्यांनी महिलांना सुद्धा भक्तिमार्गात आणून त्यांना मानसन्मान मिळवून दिला, त्यांच्या मुळेच शुद्र – अतिशुद्र वर्ग सुद्धा मोठ्या प्रमाणात भक्तित लीन होत गेला, रविदास पंथ निर्माण झाला त्यातून रविदास केवळ एका जातीचे न रहता सर्वच जाती धर्माचे आदर्श झाले असे विचार प्रसिद्ध साहीत्तिक व विचारवंत जयसिंग वाघ यांनी दीपनगर येथे आयोजित संत रविदास जयंती निमित्त कार्यक्रमात व्यक्त केले.

जयसिंग वाघ यांनी पुढं आपल्या अभ्यासपूर्ण भाषणात सांगितले की , संत रविदास यांना ११२ ते १५० वर्षाचे आयुष्य लाभले , बाल वयापासून ते ईश्वरभक्ति करत होते. प्रबोधनपर काव्य करीत होते असे असताना त्यांचे नावे १८० पदे व २३० दोहे एवढे अल्प साहित्य शिल्लक राहिले याचा अर्थ त्यांचे मुळ साहित्य एकतर कोणीतरी चोरले वा ते नष्ट केले गेले. संत रविदास यांचे एवढ्या अल्पसहित्यातून एवढी सामाजिक, धार्मिक क्रांति होवू शकते तर पूर्ण साहित्यातून काय काय बदल झाले असते याची आपण कल्पना करु शकतो. संत रविदास यांना राजदरबारी राजाच्या बरोबरीची वागणूक दिली जात होती तेंव्हा राजकीय क्रांति सुद्धा घडू शकते एवढी ताकत त्यांच्यात आहे हे आपण समजून घ्यावे आज प्रत्येक संत, महापुरुष आपापल्या जातित आपणच वाटून टाकले व आपणच त्यांचे महत्व कमी कमी करु लागलो ही एक प्रकारे आपली लाजीरवाणी बाब आहे असे स्पष्ट मत वाघ यांनी विषद करुन बुद्ध, अशोक, कबीर, रविदास, फुले, शाहू, बाबासाहेब ही परंपरा आपण चालवावी असे आवाहनही जयसिंग वाघ यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उप मुख्यअभियंता संतोष वकारे होते , त्यांनी आपल्या भाषणात संत रविदास यांचा सामाजिक व आध्यात्मिक लढा आजच्या पीढीला मार्गदर्शक आहे, ते समतेचे कैवारी असून आज समता प्रस्थापित करण्या करीता आपण कटिबद्ध होने आवश्यक आहे असे विचार व्यक्त केले.

सेवानिवृत्त मुख्य अभियंता राजेन्द्र बावस्कर यांनी रविदास यांच्या विविध दोह्यांचे दाखले देवून ते आदर्श समाजव्यवस्थेचे निर्माते होते , संत रविदास यांनी आपले १५० वर्षे जनप्रबोधना करीता खर्ची घातले, त्यांचा रविदास पंथ आजही मोठ्या प्रमाणात आहे असे सांगितले. प्रास्ताविकपर भाषणात डॉ. संजू भटकर यांनी आपण आपले आदर्श , महापुरुष जातिजातित विभागुन टाकले ही मोठी शोकांतिका आहे, संत रविदास यांनी जाती, धर्म यांच्या भिंति तोडून टाकल्या आहेत व हाच आजचा खरा आदर्श आहे असे सांगितले. आमदारसंजय सावकारे यांनी सभास्थळी भेट देवून संत रविदास यांच्या प्रतिमेस वंदन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास घोपे तर आभारप्रदर्शन मोहित कांबळे यांनी केले. कार्यक्रमास अशोक भगत, रविंद्र सोनकुसरे, मुकेश मेश्राम, चेतन आंबटकर, संजय हिरवे, किशोर शिरभैया, मनीष बेडेकर, राजेश निकम, डॉ. प्रशांत वाघ, इतर अधिकारी तसेच श्रोते मोठ्यासंखेने हजर होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीते करीता प्रशांत वाघ, रोशन वाघ, रामेश्वर तायड़े, विक्रम अहिरे, गोपाल चिम, चिंतामण सोनवणे, राजेश ढोके यांनी विशेष परिश्रम घेतले. सुरुवतीस संत रविदास यांच्या भव्य प्रतिमेचे पूजन करण्यात आले व त्यांच्या जयजयकारच्या घोषणा देण्यात आल्या.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला

मोठी बातमी…उत्तर प्रदेशमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी…90 वर ठार

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. सिकंदरराव ते एटा रस्त्यावरील फुलराई गावात सत्संग ऐकण्यासाठी आलेल्या हजारोंच्या जमावाने

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला

मोठी बातमी…उत्तर प्रदेशमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी…90 वर ठार

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. सिकंदरराव ते एटा रस्त्यावरील फुलराई गावात सत्संग ऐकण्यासाठी आलेल्या हजारोंच्या जमावाने

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा