जळगाव – येथील आदिवासी तडवी भिल्ल समाज आणि संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समिती जळगाव यांच्यातर्फे आज दुपारी जीएस मैदानावरून मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधवांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी विविध घोषणांनी जिल्हाधिकारी कार्यालय दणाणून गेले होते. आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी आणि अन्य मार्गांसाठी आज 27 रोजी भव्य मोर्चा काढण्यात आला होता.
यानंतर विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे कि,
निवेदनात म्हटले आहे की , महाराष्ट्रातील आदिवासींच्या (अनुसूचित जमाती) आरक्षणामध्ये इतर कोणत्याही जातीचा समावेश करु नये. तसेच आदिवासी जन आक्रोश मोर्च्या सर्व मागण्या मंजूर करण्यात याव्यात असे निवेदनात म्हटले आहे.
आदिवासींच्या हक्कावर डल्ला मारण्याचा इतर समूहांनी प्रयत्न करू नये असा इशारा देतांनाच सरकारने रिक्त पदे भरावीत अशी मागणी संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समिती जळगाव जिल्हा अध्यक्ष सुनील गायकवाड यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली. याप्रसंगी कार्याध्यक्ष राजू तडवी, एमबी तडवी ,उपाध्यक्ष पन्नालाल मावळे, सचिव पंढरीनाथ मोरे, प्रदीप बारेला ,अमित तडवी, रफिया तडवी, जयश्री साळुंखे, प्रमोद बारेला, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.