जळगावात गुलाबराव पाटलांनी दाखवलं ठाकरेंना आस्मान!

जळगाव – राज्यात आज ग्रामपंचायत निवडणूकाचे निकाल लागले आहेत. ग्रामपंचायत निवडणूकीत महायुतीने आपले वर्चस्व राखले आाहे. या ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने १५४ जांगावर विजय मिळवला आहे.

जळगाव ग्रामीणमध्ये तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी उबाठा गटाचे राजकीय अस्तित्वच संपवले आहे. जळगाव ग्रामीणमधील ३४ गावांमधील २९ गावांवर मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकहाती सत्ता मिळवली आहे, तर उबाठा गटाची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे.

आतापर्यंत ११२६ ग्रामपंचायतचा निकाल हाती लागला आहे, त्यामधील २१६ ग्रामपंचायतीमध्ये विजय मिळवून अजित पवार गट राज्यपातळीवर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर भाजपने ३१९ ग्रामपंचायतीमध्ये सत्ता मिळवली आहे. तर महायुतीचा तिसरा घटक पक्ष असलेल्या शिवसेनेने सुद्धा १५४ ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे. तर दुसरीकडे उबाठा गटाला अवघ्या ६९ ग्रामपंचायतीवर विजय मिळवता आला आहे. हा निकाल उबाठा गटाचे गटप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी धक्कादायक मानला जात आहे.

 

 

jalgaonsandesh

jalgaonsandesh