जळगाव : ट्रकच्या धडकेत विवाहितेसह मुलगी ठार; चिमुकला गंभीर

जळगाव – शहराकडे जात असलेल्या दुचाकीला पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात विवाहितेसह १७ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर तीन वर्षाचा मुलगा गंभीर जखमी आहे.

ही धक्कादायक घटना बुधवारी (दि.२८) मानराज पार्कजवळ दुपारी दोनच्या सुमारास घडली. दिक्षिता राहूल पाटील (वय २७) व पायल उर्फ खुशी देवेंद्र जलंकर (वय १७) अशी मृतांची नावे आहेत तर रूद्रा राहूल पाटील (वय ३) हा चिमुकला गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील वाटिकाश्रम येथील द्वारकाई अपार्टमेंट येथे पायल जलंकर ही मुलगी परिवारासह राहते. याच अपार्टमेंटमध्ये दिक्षिता पाटील ही विवाहिता आपल्या माहेरी आली होती. या अपार्टमेंटमध्ये राहणारे निलेश पाटील यांना मुलगा झाला होता. त्यामुळे त्या मुलाला पहाण्यासाठी दिक्षिता पाटील ही विवाहित महिला आपल्या मुलासह पायल जलंकर हिच्यासोबत बुधवारी दुपारी (क्र. एम एच १८ ए एस ५३७९) या दुचाकीवरून हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी निघाली होती. खोटे नगरकडून शहराकडे दुचाकीने जात असतांना मानराज पार्कजवळील पुलाच्या उतरतीवर मागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक देवून दोघांना चिरडल्याने पायल जंलकर व दिक्षिता पाटील या दोघींचा जागीच मृत्यू झाला. तर रूद्र हा चिमुकला गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

ही घटना नजीकच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला . या घटनेबाबत जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला