जळगाव तालुक्यातील पंचायत समितीच्या १० गणांचे आरक्षण जाहीर.

आज पंचायत समिती कार्यालयात जळगाव तालुका पंचायत समितीच्या एकुण १० गणांचे आरक्षण प्रांताधिकारी महेश सुरळकर यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आले.

यावेळी प्रांत महेश सुरळकर, जळगाव तहसीलदार नामदेव पाटील, परिविक्षाधिन नायब तहसीलदार मयूर कळसे, नायब तहसीलदार विशाल सोनवणे, लिपिक अश्विन वाघ यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

भोकर – सर्वसाधारण, कानळदा – सर्वसाधारण महिला, ममुराबाद – सर्वसाधारण, आसोदा – अनुसुचित जमाती महिला, भादली बुद्रुक – अनुसुचित जाती महिला, कुसुंब खुर्द – अनुसुचित जाती, शिरसोली– नामप्र महिला, धानवड – नामाप्र, म्हसावद – सर्वसाधारण महिला, बोरनार -सर्वसाधारण. याप्रमाणे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.