जळगाव कारागृहात खूनी थरार. मध्यरात्री डाव साधत एका कैद्याने दुसऱ्याला जीवेच मारले

जळगाव – जळगावच्या कारागृहात मध्यरात्री खूनी थरार पाहायला मिळाला. पहाटे दीड वाजेच्या सुमारास एका कैद्याने दुसऱ्या कैद्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यामुळे हा कैदी गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेत असतानाच या कैद्याने जीव सोडला.

त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. मोहसीन असगर खान (वय 34) असं मृत कैद्याचं नाव आहे. भुसावळ येथील माजी नगरसेवक रवींद्र खरात यांचा हत्याकांडातील तो आरोपी आहे. त्याचाच तुरुंगात खून करण्यात आल्याने पोलीसही हादरून गेले आहेत. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी केली जात आहे.

भुसावळ येथील माजी नगरसेवक रवींद्र बाबूराव खरात यांच्या हत्याकांडातील आरोपीची हत्या करण्यात आली आहे. जळगाव जेलमध्ये दोन कैद्यांमध्ये अंतर्गत वाद झाला. त्यात एकाची हत्या करण्यात आली आहे. भुसावळचे माजी नगरसेवक तथा रिपाइंचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष रवींद्र बाबूराव खरात (वय 55) यांची 7 ऑक्टोबर 2019 रोजी भुसावळमध्ये अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती.

एका टोळक्याने त्यांच्यासह कुटुंबातील सदस्यांवर केलेल्या भयंकर हल्ल्यात रवींद्र खरात यांच्यासह एकूण पाच जणांचे बळी गेल्याने परिसर हादरला होता. पूर्व वैमनस्यातून हे हत्याकांड झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले होते. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांना जळगाव कारागृहात ठेवण्यात आलं होतं.

दुपारी भांडले, रात्री हल्ला

यातील एक आरोपी मोहसीन असगर खान याचं तुरुंगातील दुसऱ्या कैद्याशी काल दुपारी भांडण झालं. दुपारपासूनच या दोघांमध्ये धुसफुस सुरू होती. त्याचा राग मनात ठेवून दुसऱ्या आरोपीने आज पहाटे दीड वाजेच्या सुमारास मोहसीन असगर खानवर हल्ला चढवत त्याला गंभीर जखमी केले. असगरला तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याला मृत घोषीत करण्यात आले.

मयत असगर याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आला होता. या हत्याकांडाची माहिती मिळताच पोलिसांनी तुरुंगात धाव घेऊन आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत. या हत्याकांडात दुसरा काही अँगल आहे का याचा तपास पोलीस करत आहे. मात्र, या घटनेमुळे भुसावळमधील गँगवार आता जेलमध्ये पोहोचल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला