जळगाव – कंटेनरने तीन वर्षीय बालकास चिरडले, घटनास्थळी तणाव

जळगाव – तालुक्यातील तळेगाव जवळ चांदवड जळगांव महामार्गावरुन जाणार्‍या भरधाव कंटेनरखाली आल्याने साडेचार वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडे सात ते आठ वाजेच्या सुमारास घडली.

मयताचे नाव जीवन सचिन मोरे(३) रा .तळेगाव असे आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याघटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी कंटेनरचालकाला मारहाण करत कंटेनरला आग लावली. या घटनेत लहान बालकाच्या मृत्यूने तळेगाव आणि परिसरातील नागरिकांचे समाजमन सुन्न झाले असून दिवसभर या घटनेची हळहळ व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्र्यांचा दौर सोडून घटनास्थळी पोलिस अधिकारी व कर्मचार्‍यांनी धाव घेवून, कडक बंदोबस्त ठेवण्यात आला. अपघातग्रस्त कंटेनर हा के.ए.४४ ए १९७५ अश्या क्रमांकाचा असल्याचा आणि तो मनमाडकडे जात असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. लहान मुलाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या या कंटेनरला संतप्त जमावाने जाळत रस्ता रोको केला. गावात रस्त्याला गतिरोधक नसल्याने हा अपघात घडल्याचा आरोप गावकर्‍यांनी केला आहे. कंटेनरला लागलेली आग विझविण्यासाठी चाळीसगांव येथून अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. रात्री उशिरापर्यंत चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला या घटनेबाबत फक्त आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जमावाकडून मारहाण करण्यात आलेला कंटनेर चालक सद्या रुग्णलायात उपचार घेत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

ताजा खबरें