जळगाव शहरात ३० वर्षीय तरुणाचा खून ! जळगावात जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरुच.

जळगाव – :शहर पुन्हा हादरलं असून शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावर ३० वर्षीय युवकाचा धारदार हत्याराने खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

मिळालेल्या माहिती नुसार शहरातील गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावर सोपान गोविंदा हटकर (३०, रा. हरिविठठल नगर) या तरुणाचा धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना रविवारी रात्री १० वाजता घडली. मात्र, खून होण्यापूर्वी गोलाणी मार्केटच्या तळमजल्यावर काही तरुणांमध्ये वाद झाला होता, त्यातून हा खून झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आल्यानंतर आजू बाजूच्या लोकांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी,उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एलसीबीचे निरीक्षक किसन नजनपाटील, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड हे घटनास्थळी पोहचले त्यानंतर पोलिसांनी मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवीला.तसेच नेमकी काय घटना घडली याचा तपास पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत सुरू होता तर संशयितांच्या शोधार्थ पथक सुध्दा रवाना झाले आहे.

jalgaonsandesh

jalgaonsandesh