जळगाव बाजार समितीची निवडणूक ठरली लक्षवेधी, पाहा कोणी मारली बाजी?

जळगाव – मंत्री गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला असलेल्या जामनेर बाजार समितीवर गिरीश महाजन यांना त्यांचा गड कायम राखण्यात यश आले आहे.

भुसावळ बाजार समितीवर भाजप शिंदे गटाच्या महायुतीने एकहाती सत्ता मिळवत महाविकास आघाडीचे नेते एकनाथ खडसे यांना जोरदार धक्का दिला आहे.

भुसावळ बाजार समितीवर पराभव झाला असला तरी एकनाथ खडसे यांनी त्यांच्या मतदारसंघातील रावेर बाजार समितीवर त्यांचा करिष्मा दाखवत एक हाती सत्ता मिळवली आहे. रावेर बाजार समितीवर 13 जागांवर महाविकास आघाडीचे पॅनलने यश मिळवलं.

पारोळा बाजार समितीवर विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांच्या पॅनलचा दारुण पराभव करत राष्ट्रवादीचे माजी मंत्री डॉक्टर सतीश पाटील यांच्या महाविकास आघाडीच्या पॅनलने एक हाती सत्ता मिळवली आहे.

जिल्ह्यात  पार पडलेल्या मतमोजणीत सहा बाजार समिती रावेर बाजार समितीवर दोन जागांवर विजय मिळवत प्रहार जनशक्ती जनशक्तीने या निवडणुकीच्या माध्यमातून खाता उघडला आहे.

चोपडा बाजार समिती ही शिंदे गटाचे आमदार लता सोनवणे यांच्या मतदारसंघातील बाजार समिती या ठिकाणी मात्र काटे की टक्कर पाहायला मिळाले. 18 पैकी केवळ नऊ जागांवर भाजप शिंदे गटाच्या पॅनलला विजय मिळवता आला. उर्वरित पाच जागांवर महाविकास आघाडीचे पॅनल तर दोन जागांवर बंडखोर भाजप व राष्ट्रवादी प्रणित सहकार पॅनलने विजय मिळवला.

jalgaonsandesh

jalgaonsandesh