सुनसगाव येथे मध्यरात्री कोसळले घर मात्र हानी नाही ?

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील रहिवाशी पंढरीनाथ चांगो कंकरे धनगर यांच्या मालकीचे राहत्या घरा शेजारी असलेल्या घराचा काही भाग मध्यरात्री च्या सुमारास अचानक पडला. विशेष म्हणजे पंढरीनाथ कंकरे यांचा शेळी पालन व्यवसाय असल्याने या ठिकाणी शेळ्या बांधण्यात आलेल्या होत्या.

मात्र मध्यरात्री च्या सुमारास वरतून माती व चूना पडू लागल्याने घरातील मंडळी वेळीच सावध झाली आणि या जागेवर बांधलेल्या शेळ्या पटकन सोडून दुसऱ्या जागेत नेल्या त्यामुळे मोठा अनर्थ टळला अन्यथा अनेक शेळ्या या ठिकाणी दाबल्या गेल्या असत्या असे घटना पाहणाऱ्यांनी सांगितले आहे. मध्यरात्री च्या सुमारास ही घटना घडल्याने मोठा आवाज झाला त्यामुळे ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. कोणत्याही प्रकारची जिवीतहानी या ठिकाणी घडलेली नाही.