गावागावात पारायण सप्ताह होणे गरजेचे – हभप रमेश महाराज

प्रतिनिधी – जितेंद्र काटे

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे दि. १३ डिसेंबर पासून सालाबादप्रमाणे श्री खंडेराव मंदीराच्या परिसरात पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहात श्री शिवमहापुराण कथा प्रवक्ते हभप संजय महाराज चितोडा हे सुश्राव्य वाणीतून भाविकांना सुलभ आणि साध्या पद्धतीने निरुपण करीत असून पहिल्या दिवशी किर्तनात हभप रमेश महाराज सुनसगाव यांनी संत तुकाराम महाराजांच्या’ नामसंकीर्तन साधन पै सोपे, जडतील पापे अंतरीची या अभंगावर विवेचन केले. यावेळी गावागावात पारायण सप्ताह होणे गरजेचे असून संतांचे विचार पोहचणे गरजेचे आहे त्यामुळे एक नविन उर्जा निर्माण होते आणि गावातील वातावरण चांगले राहते असे सांगितले आणि सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक असे दाखले देत आपल्या गावाचा विकास साधावा असे सांगितले.यावेळी गायनाचार्य गोपाळ महाराज भांबलवाडी, कैलास महाराज शिंगत, महेश महाराज कळमोदा व गावातील भजनी मंडळी तसेच मृदंगमणी हभप मुरलीधर बेंडाळे यांनी साथ दिली.

jalgaonsandesh

jalgaonsandesh