मुंबई – इंडियन प्रीमियर लीगच्या १७व्या हंगामाची सुरूवात आज २२ मार्चपासून होत आहे. पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांचे संघ आमने सामने असतील. या सामन्यात चेन्नईचा संघ नव्या कर्णधारासह मैदानात उतरत आहे.
यासोबतच आयपीएलच्या पहिल्या सामन्यासोबत नव्या पर्वाची सुरूवातही होईल ज्यात महेंद्रसिंग धोनीच्या जागी आता नेतृत्व ऋतुराज गायकवाडच्या हाती आहे. हा सलामीचा सामना चेन्नईच्या एम ए चिदम्बरम स्टेडियममध्ये रात्री ८ वाजता खेळवला जाईल.
बंगळुरूविरुद्ध चेन्नईचे पारडे जड
पाच वेळा चॅम्पियनचा खिताब आणि गतविजेता चेन्नईच्या नजरा यंदा सहावा खिताब जिंकण्यावर असतील. दुसरीकडे आरसीबीची संघ पहिल्यांदा खिताब जिंकण्यासाठी पुन्हा जोर लावणार आहे. सीएसके आणि आरसीबीचे संघ आतापर्यंत ३१ वेळा आमनेसामने आलेत. यात २० वेळा चेन्नईने बाजी मारली तर १० वेळा बंगळुरूचा विजय झाला.
चेन्नईचे नेृतत्व आता ४२ वर्षीय धोनीच्या ऐवजी युवा खेळाडू ऋतुराज गायकवाडकडे सोपवण्यात आली आहे. दुसरीकडे क्रिकेटची जबरदस्त समज असलेला धोनीचे डोके जबरदस्त आहे मात्र वयानुसार त्याच्या फलंदाजीतील चपळता कमी झाली आहे. अशातच युवा खेळाडूंवर कामगिरीची मोठी जबाबदारी असेल.
दोन्ही संघ अशाप्रकारे
चेन्नई सुपर किंग्स: महेंद्र सिंह धोनी, ऋतुराज गायकवाड़ (कर्णधार), मोईन अली, दीपक चाहर, तुषार देशपांडे, शिवम दुबे, अजय मंडल, मुकेश चौधरी, अजिंक्य रहाणे,शाइक रशीद, मिचेल सँटनर, सिमरजीत सिंह, निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, महीष तीक्ष्णा, रचिन रवींद्र , शार्दुल ठाकुर, डेरिल मिचेल, समीर रिजवी, मुस्ताफिजुर रहमान, अवनीश राव अरावेली.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु: विराट कोहली, फाफ डु प्लेसी (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडगे, मयंक डागर, विजय कुमार वैशाक, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीसे टॉपली, हिमांशु शर्मा, राजन कुमार, कॅमरून ग्रीन, अल्जारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्यूसन, स्वप्निल सिंह, सौरव चौहान.