अतिक्रमण भोवले,पारोळ्यातील म्हसवे येथील सरपंच, सदस्य अपात्र

पारोळा तालुक्यातील म्हसवे येथील सरपंच ज्योती सतीश संदनशीव आणि सदस्य उषा दीपक सैंदाणे यांना सरकारी व सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करणे भोवले असून जिल्हाधिकारी यांनी त्यांना अपात्र घोषित केले आहे. याबाबतचा निकाल २४ मार्च रोजी देण्यात आला आहे.

म्हसवे येथील माधुरी खंडू पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली होती. सरपंच ज्योती संदांनशीव यांचे आजल सासरे भागवत उदा संदांनशीव यांच्या नावाने जमीन आहे. त्या जमिनीत १९८ चौरस फूट इतके जास्तीचे अतिक्रमण चौकशीत आढळून आले आहे. तसेच सदस्य उषा दिपक सैंदाणे यांचे सासरे मगन खंडू सैंदाणे यांच्या नावाने जमीन आहे. त्या जमिनीवर २६१ चौरस फूट इतके जास्तीचे अतिक्रमण चौकशीत जिल्हाधिकारी अमन मित्तल यांना आढळून आले आहे.

त्यानुसार त्यांनी सरपंच ज्योती सतीश संदनशीव आणि सदस्य उषा दीपक सैंदाणे यांना अपात्र घोषित केले आहे. यामुळे म्हसवे गावात खळबळ उडाली असून राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. ॲड.वसंंत भोलाणकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या समोर युक्ती वाद करून काम काज पहिले

jalgaonsandesh

jalgaonsandesh