भारतीय बौद्ध महासभेची यावल तालुका फैजपूर शहर कार्यकरणी जाहीर

फैजपूर – दि.21/03/24 गुरुवार रोजी भारतीय बौद्ध महासभेची फैजपूर येथे आंबेडकर नगर मधील सम्राट बुद्ध विहार, येथे भारतीय बोद्ध महासभा जळगाव जिल्हा पूर्व ची नुकतीच बैठक जिल्हा अध्यक्षा प्रियंका अहिरे ह्याच्या अध्यक्ष ते खाली संपन्न झाली. त्यावेळी प्रमुख उपस्थितामध्ये जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार, जिल्हा संघटक रंजना ठाकरे, कार्यलयीन सचिव सुषमा इंगळे, जिल्हा संघटक वनमाला हिवाळे, कोषाध्यक्ष शैलेंद्र जाधव, कल्पना तायडे, जिल्हा प्रचार व पर्यटन सचिव वसंत लोखंडे, लेफ्ट कर्नल युवराज नरवाडे, जिल्हा संघटक प्रकाश सरदार, केंद्रीय शिक्षक बी. डी. महाले सर, जिल्हा संघटक छाया सुरवाडे, श्रावण साळुंके, विजय भालेराव,यावल संघटक सुधाकर तायडे इत्यादी प्रमुख पदाधिकारी उपस्थित पुढील प्रमाणे कार्यकारणीची निवड करण्यात आली.

त्यावेळी प्रथम रिक्त जिल्हा संघटक पदी वसुंधरा प्रवीण मेढे याची निवड करण्यात आली.यावल तालुका कार्यकारणी अध्यक्ष माया सुरेश तायडे,सरचिटणीस इंद्रायणी हिंमत इंदाटे कोषाध्यक्ष ज्योसना विजय भालेराव,सचिव लक्ष्मीबाई बाळू अडकमोल, संघटक जनाबाई अरुण सुरवाडे.महिला फैजपूर शहर कार्यकारणी अध्यक्ष प्रतिभा शैलेंद्र अवसरमल, सरचिटणीस प्रियंका नितीन इंगळे, उपाध्यक्ष कोकीळाबाई गोकुळ मेढे,कोषाध्यक्ष लिखिता सतीश साळुंखे, संघटक प्रतिभा किशोर केदारे यांची निवड करण्यात आली.महिलांना धम्मसेवक अशोक भालेराव आणि रेखाताई शैलेंद्र मेढे यांनी पुढील चळवळीसाठी शुभेच्छा दिल्या.केंद्रीय शिक्षक बी. डी. महाले यांनी बैठकी आयोजन करीता परिश्रम घेतले.भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी आणि नवीन कार्यकारणी पदाधिकारी धम्म उपासक उपासिका यांचे अभिनंदन केले. आभार बी. डी. महाले यांनी केले.

jalgaonsandesh

jalgaonsandesh