भारतीय बौद्ध महासभेची भुसावळ तालुका कार्यकरणी जाहीर

भुसावळ – आज 21/03/24 गुरुवार रोजी भारतीय बौद्ध महासभेची भुसावळ येथील शील रत्न बुद्ध विहार, येथे भारतीय बोद्ध महासभा जळगाव जिल्हा पूर्व ची नुकतीच बैठक जिल्हा अध्यक्षा प्रियंका अहिरे ह्या अध्यक्ष ते खाली झाली. त्यावेळी प्रमुख उपस्थितामध्ये जिल्हा सरचिटणीस वैशाली सरदार, जिल्हा संघटक ठाकूर, वनमाला हिवाळे, कोषाध्यक्ष शैलेंद्र जाधव, कल्पना तायडे, जिल्हा प्रचार व पर्यटन सचिव वसंत लोखंडे, लेफ्ट कर्नल युवराज नरवाडे, समता सैनिक दलाचे उपाध्यक्ष रमेश साळवे, जिल्हा संघटक प्रकाश सरदार,सुषमा इंगळे, छाया सुरवाडे, ठाकरे भुसावळ तालुका अध्यक्ष उत्तम सुरवाडे, सरचिटणीस अरुण तायडे, कोषाध्यक्ष श्रावण साळुंके, ता. उपाध्यक्ष प्रवीण डांगे,पांडव बाबा,केंद्रीय शिक्षिका सुमित्रा सर्वटकर, सीमा अहिरे, इत्यादी उपस्थित होते.

भुसावळ तालुका पुढील प्रमाणे निवडण्यात आली भुसावळ तालुका अध्यक्ष शोभा सुरवाडे, सरचिटणीस संगीता बोलके,कोषध्यक्ष पूनम प्रधान,उपाध्यक्ष संरक्षण सुनंदा साळवे,उपाध्यक्ष पर्यटन प्रचार सविता धुरंधर, उपाध्यक्ष संस्कार सुकेसनी सर्वतकर, हिशोब तपासणीस पल्लवी खंडारे, कार्यलयीन सचिव वृषाली इंगळे, सचिव संस्कार मंगला तायडे, विद्या सुरवाडे, सुनीता मोरे, प्रतिभा सुरवाडे, अर्चना वानखेडे, मंदा धंधरे,संघटक लीलाबाई तायडे, मनीषा वानखेडे,कल्पना पांडव, रुपाली गवई, वैजानता कदम, मीना सुरवाडे, बबिता सुरवाडे कार्यक्रम यशस्वीते साठी उत्तम सुरवाडे, अरुण तायडे, प्रवीण डांगे, पांडव बाबा यांनी परिश्रम घेतले.